Dharashiv Political News : आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत आपल्या वक्तव्यांनी कायम चर्चेत असतात. त्यात मतदारसंघात असले तर त्यांच्या उत्साहा जरा अधिकच असतो. (Tanaji Sawant Allegation) भूम येथील एका कार्यक्रमात त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थ मंत्री अजित पवार आणि माजी आमदार राहुल मोटे यांच्यावर थेट नाव न घेता जोरदार हल्ला चढवला.
मतदारसंघातील विकासकामांवर बोलत असतांना सिंचनाचा विषय निघताच त्यांनी `काका-भाच्याने कॅनाॅल खोदून गुत्तेदार जगवले, हप्ते गोळा केले`, असा जाहीर आरोप केला. आता धाराशिव जिल्ह्यात `काका-भाचे`, म्हणून कुणाचा उल्लेख होतो, हे वेगळं सांगायची गरज नाही. राज्याच्या सत्तेत मंत्री म्हणून सोबत काम करत असतांना जाहीरपणे अशा प्रकारची टीका तानाजी सांवत (Tanaji Sawant) यांनी केल्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
माजी आमदार राहुल मोटे व त्यांचे नात्याने काका असलेल्या अजित पवार यांच्यावरच सावंत यांचा रोख असल्याचे बोलले जाते. (Osmanabad) परंडा मतदारसंघाचे माजी आमदार राहुल मोटे हे अजित पवारांच्या साडूचे चिरंजीव आहेत. त्यामुळे या दोघांमध्ये काका-भाच्याचे नाते आहे. संपुर्ण जिल्ह्यात अजित पवार, (Ajit Pawar) राहुल मोटे यांचे नाते सर्वश्रुत असल्यामुळे भूममध्ये सावंत यांनी या दोघांना उद्देशूनच हे आरोप केलेत हे वेगळं सांगायला नको.
सांवत आमदार असलेल्या भूम-परांडा मतदारसंघातून राहुल मोटे हे तीनवेळा निवडून आलेले आहेत. अजित पवार यांची त्यांना कायमच साथ मिळाल्याचे पहायला मिळाले. पण यावेळी प्रा.तानाजी सावंत यांनी राहुल मोटे याचा पराभव केला. तरीही महाविकास आघाडी सरकार असताना सावंत यांनी राहुल मोटे व अजित पवार यांच्याविरोधात अशीच वक्तव्य केली होती. एवढेच नाही तर शरद पवार यांच्यावरही ते घसरल्याचे दिसले होते. आता अजित पवार विद्यमान सरकारमध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री आहेत, असे असतानाही सावंत यानी पुन्हा त्यांच्यावर हल्ला चढविल्याने त्याची चर्चा सूरु झाली आहे.
आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांनी चर्चेत असणारे डॉ. सावंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता तोफ डागली. मिस्टर टेन पर्सेंट असा उल्लेख करत त्यांनी काका-भाच्यांवर निशाणा साधला. सावंत यांनी त्यांच्या परंडा मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना, भूम येथील एका खाजगी कार्यक्रमात बोलतांना नाव न घेता पवार-मोटे यांच्यावर हे आरोप केले आहेत. सत्तेत असलेल्या शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीच्या कॅबिनेटमधील एका मंत्र्याने उपमुख्यमंत्र्यांवर केलेल्या या आरोपांमुळे महायुतीत सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.