MlA Bhondekar News : भंडारा जिल्ह्याला हवाय घरचा पालकमंत्री, आमदार भोंडेकरांचा शिंदे-फडणवीसांना इशारा !

Bhandara : त्यावेळी जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही.
Narendra Bhondekar, Eknath Shinde and Devendra Fadanvis
Narendra Bhondekar, Eknath Shinde and Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

independent MLA Narendra Bhondekar News : राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात सत्ताधारी पक्षाला न्यायालयाने दिलासा दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली वारी करून आले. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. (Narendra Bhondekar gave warning to the Shinde-Fadnavis government)

काल (ता. ६) आमदार भोंडेकर भंडाऱ्यात पत्रकारांशी बोलत होते. येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होण्याची दाट शक्यता आहे. या अनुषंगाने भंडारा जिल्ह्यासाठी पालकमंत्री बाहेरचा की घरचा, ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. मात्र, बाहेरचा पालकमंत्री दिल्यास त्याला १०० टक्के विरोध असेल, असा इशारा भंडाऱ्यातील शिंदे गटाचे समर्थक अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. त्यावेळी जिल्ह्यातील एकाही आमदाराला मंत्रिपद मिळाले नाही. साकोलीचे आमदार नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाली होती. पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा देताच काही महिन्यांतच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले.

सत्तांतरानंतर राज्यातील शिंदे-फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे सरकार येऊन आता वर्षभराचा कालावधी झाला असला तरी, मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय आता घ्यायलाच पाहिजे. मला मंत्रिपद देत नसाल तर भाजप किंवा शिवसेनेच्या एखाद्या कार्यकर्त्याला मंत्रिपद द्या. पण पालकमंत्री मात्र स्थानिकच द्या, असे आमदार नरेंद्र भोंडेकर माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Narendra Bhondekar, Eknath Shinde and Devendra Fadanvis
Bhandara Bazar Samiti: भाजपचा पुन्हा काँग्रेसच्या गडाला सुरुंग; उमेदवार फोडून बाजार समितीवर भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता

मंत्रिपदाच्या बाबतीत भंडारा (Bhandara) जिल्ह्यावर अन्याय होता कामा नये. बाहेरच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना भंडाऱ्याचा पालकमंत्री बनवल्याने जिल्ह्याचा विकास खुंटतो. त्यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा कार्यकर्ते यांचा विचार व्हावा. आता मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायलाच पाहिजे, ही माझीच नाही तर, सर्व आमदारांची (MLA) भावना आहे. वर्षभरापासून केवळ २० मंत्र्यांवरच राज्याचा कारभार चालला असून आता संपूर्ण मंत्रिमंडळ व्हायला पाहिजे. असे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com