Bhandara Bazar Samiti: भाजपचा पुन्हा काँग्रेसच्या गडाला सुरुंग; उमेदवार फोडून बाजार समितीवर भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीची सत्ता

Bhandara APMC Election Result : भंडारा बाजार समितीवर १८ पैकी ९ संचालक हे काँग्रेस समर्थित निवडून आले होते.
Bhandara APMC Election Result :
Bhandara APMC Election Result : Sarkarnama
Published on
Updated on

Bhandara Bazar Samiti News : भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुकीत काँग्रेस समर्थित गटातील संचालकाने भाजपात प्रवेश केल्याने भाजप उमेदवाराच्या गळ्यात सभापती पदाची माळ पडली. बाजार समितीच्या सभापतीपदी भाजपचे विवेक नखाते यांची तर उपसभापतीपदी शिंदे गटाचे नामदेव निंबार्ते यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेस समर्थित संचालकानेच ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भंडारा कृषी उत्पन्न बाजार समितीवरील १५ वर्षांपासूनचा काँग्रेसचा बुरूज भाजपने उद्‌ध्वस्त केला.

Bhandara APMC Election Result :
Jayant Patil Meets Sharad Pawar: राष्ट्रवादीच्या गोटात हालचालींना वेग; ईडी'च्या चौकशीनंतर जयंत पाटील आज शरद पवारांना भेटणार...

भंडारा बाजार समितीवर १८ पैकी ९ संचालक हे काँग्रेस समर्थित निवडून आले होते. तर राष्ट्रवादी-भाजपा-शिंदे गटाचे एकूण सहा आणि तीन अपक्षांची निवडून आले होते. पण भाजप, राष्ट्रवादी आणि शिंदे गटान अपक्ष उमेदवारांवर दावा ठोकल्याने दोन्ही गटाचे संख्याबळ नऊ-नऊ असे झाले. पण बहुमतासाठी दोन्ही गटांना एका संचालकाच्या पाठिंब्याची गरज होती. पण गेल्या १५ वर्षांपासून भंडारा बाजार समितीवर सभापती असलेल्या रामलाल चौधरी यांच्या गटातील विवेक नखाते यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपचे संख्याबळ वाढले. (Bhandara News)

नखाते यांच्या भाजप प्रवेशामुळे रामलाल चौधरी यांच्या गटाकडे आठ संचालक तर राष्ट्रवादी-भाजप-शिंदे गटाकडे १० संचालक झाले. भाजपचे संख्याबळ वाढल्याने भंडारा बाजार समितीवर भाजप-शिंदे गट आणि राष्ट्रवादीची सत्ता आली. रविवारी (21 मे) सभापती आणि उपसभापतीपदासाठी निवडणूक झाली. (Vidarbha Apmc Election Result)

Bhandara APMC Election Result :
Rajasthan News: सचिन पायलटांचा अल्टिमेटम् काँग्रेसने साफ धुडकावला; खर्गे-गहलोत दिल्लीत बैठक!

या निवडणुकीत सभापतीपदासाठी काँग्रेसच्या गटातून रामलाल चौधरी आणि राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना गटाकडून विवेक नखाते रिंगणात होते. तर उपसभापतीपदासाठी काँग्रेसकडून नितीन कडव आणि राष्ट्रवादी-भाजपा-शिवसेना गटाकडून नामदेव निंबार्ते यांच्यात लढत झाली. (Bhandara APMC Elction)

सभापती पदाच्या निवडणुकीत रामलाल चौधरींनाआठ तर विवेक नखातेंना १० मते मिळाली. तर उपसभापती निवडणुकीत नामदेव निंबार्ते यांना १० तर नितीन कडव यांना ८ मते मिळाली. नखाते आणि निंबार्ते विजयी झाले.

Bhandara APMC Election Result :
Rahul Gandhi Photos : राहुल गांधींनी केला ट्रकमधून प्रवास ; खास फोटो पाहिले का?

सभापती पदाच्या निवडणुकीच्या एक दिवसआधी भाजपने विवेक नखातेंचा भाजप प्रवेश करुन घेतला. सत्तेचा दुरुपयोग करत नखातेंवर दबाव टाकून त्यांना आमिष दाखवून नखातेंना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बनवण्यात आले. पण अशा गद्दारा व्यक्तीला जनता माफ करणार नाही, अशी टीका रामलाल चौधरी यांनी केली.

Edited by-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com