Wardha : आर्वी विधानसभा मतदारसंघात दादारावांचा कोण झाला ‘सुमित’?

BJP : पक्षातील उपक्रमांच्यानिमित्ताने वर्ध्यातील दोन दिग्गज फ्रंटफूटवर
Dadarao Keche & Sumit Wankhede.
Dadarao Keche & Sumit Wankhede.Sarkarnama
Published on
Updated on

Vidhab Sabha Politics : विदर्भातील महत्त्वाचा जिल्हा असलेल्या वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघात भाजपची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशात आमदार दादाराव केचे यांना नवा ‘सुमित’ अर्थात चांगला मित्र मिळाला आहे. दादारावांच्या या नव्या मित्राने त्यांचा विश्वास संपादन करीत व त्यांना विश्वासात घेत आपले राजकीय मार्गक्रमण सुरू केले आहे.

भाजपच्या राजकीय वर्तुळात हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले हे नाव आहे सुमित वानखेडे यांचे. वानखेडे हे वर्धा जिल्ह्यात भाजपने ‘नेटवर्क स्ट्राँग’ करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून दिवसरात्र झिजत आहेत.

Dadarao Keche & Sumit Wankhede.
Wardha Politics : गडकरींनंतर खवय्येगिरीची आवड असलेले हे खासदार पाहिलेत का...?

सुमित वानखेडे यांना भाजपने वर्धा जिल्ह्याची जबाबदारी सोपविल्यानंतर काहींनी त्यांच्यात व आर्वीचे विद्यमान आमदार दादाराव केचे यांच्यात मतभेद निर्माण व्हावेत, यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केले. परंतु आमदार दादाराव केचे आणि सुमित वानखेडे या दोघांनीही हे डावपेच हाणून पाडले. वानखेडे यांनी दादारावांना विश्वासात घेत पावले टाकली आहे. आमदार केचेदेखील तितक्यात आपुलकीने त्याला प्रतिसाद देत आहेत.

सुमित वानखेडे यांनी नुकतेच आर्वी येथे ‘नमो चषक’ स्पर्धेचे आयोजन केले. आर्वी परिसरातील नागरिकांसाठी मॅरेथॉन घेण्यात आली. या स्पर्धेसाठी सुमित वानखेडे यांनी आमदार केचे यांना रीतसर निमंत्रण दिले. आमदार दादाराव केचे यांनीही मोठे मन करीत स्पर्धकांना हिरवा झेंडा दाखविला. मोठ्या प्रमाणावर स्पर्धत या मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे एका दगडात दोन पक्षी अर्थात सुमित वानखेडे आणि दादाराव केचे यांना टिपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे चेहरे पडले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार दादाराव केचे यांचे मन कलुषित करायचे आणि त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत वानखेडेंवर निशाणा साधायचा, अशी गुप्त कारस्थाने करणाऱ्यांना भाजपच्या या दोन्ही नेत्यांनी एकत्र येत आपल्या कृतीतून चोख प्रत्युत्तर दिले आहे. आमदार दादाराव केचे काय आणि सुमित वानखेडे काय, या दोन्ही नेत्यांना वर्धा जिल्ह्यातील भाजपचा गड मजबूत करायचा आहे. सुरुवातीपासूनच या दोघांमध्ये कोणतेही वाद नाही. वर्धा जिल्ह्यातील भाजपमध्ये कोणतीही गटबाजीदेखील नाही. परंतु दोन नेत्यांमध्ये वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात आमदार केचे आणि वानखडे यांनी यांनी एकमेकांचे चांगले मित्र अर्थात ‘सुमित’ असल्याचे दर्शन घडविल्याने अनेकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.

Edited by : Prasannaa Jakate

Dadarao Keche & Sumit Wankhede.
Nagpur : सरकारने नियुक्त्या करताना विचार करावा... असं का म्हणाले वडेट्टीवार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com