MLA Nitin Deshmukh vs Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अकोला जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील पाणी नागपूर येथे जाऊ न देण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत एकत्र झालेल्या आमदारांसह १२५ जणांवर जुने शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. (A case has been registered against 125 people at Old City Police Station)
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. बाळापूर व अकोला जिल्ह्यातील ६९ खेडी पाणीपुरवठा योजनेला स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ आमदार नितीन देशमुख यांनी गेल्या सोमवारी अकोला येथून नागपूरकरिता संघर्ष यात्रा काढली आहे. राजराजेश्वर मंदिरापासून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली होती. यावेळी शेकडो शिवसैनिकांसह ६९ खेड्यातील ग्रामस्थदेखील सहभाग झाले होते.
जिल्ह्यात जमावबंदी असताना आमदार नितीन देशमुख यांनी नागरिकांना एकत्र केल्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन झाले असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यासह १२५ जणांवर जुने शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. आपल्या हक्कासाठी शांततेच्या मार्गाने यात्रा काढल्याने गुन्हे दाखल केल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
सरकारने पाणी उपलब्ध करून दिले असते तर आमच्यावर ही वेळच आली नसती, याचा तरी सत्ताधाऱ्यांनी विचार करावी, असे या नागरिकांचे म्हणणे आहे. खारे पाणी पिणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या हक्कासाठी संघर्ष यात्रा काढली म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणारे अकोला पोलिस गुरुवारी राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री अकोल्यात आले असता त्यांच्या स्वागतासाठी एकत्रित आलेल्या लोकांवर व गृहमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्याची हिंमत दाखवतील, असा प्रश्न आमदार नितीन देशमुख यांनी उपस्थित केला आहे.
जिल्ह्यात (Akola) जमावबंदी कशासाठी लावली, असा सवालही त्यांनी केला. जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. कोरोनाचा उद्रेक झाला नाही. असा परिस्थितीत केवळ शिवसेना संघर्ष यात्रा काढणार आहे, म्हणून जमावबंदी लागू केली का, असा प्रश्नही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे.
अवैध धंद्याविरुद्ध शिवसैनिक होणार आक्रमक..
ज्या तत्परतेने शिवसैनिकांवर (Shivsainik) गुन्हा दाखल करण्यात आला, तीच तत्परता जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक दाखवत नाही. सर्रासपणे अवैध धंदे जिल्ह्यात सुरू असल्याचा आरोप करीत आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी संघर्ष यात्रा संपल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध शिवसैनिक आक्रमक होऊन स्वतःच कारवाई करतील, असा इशाराही दिला.
(Edited By - Atul Mehere)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.