Gadchiroli BJP : गडचिरोलीचा विधानपरिषदेसाठी भाजपने विचार करावा; 'या' बड्या नेत्यांचा आग्रह

MLC Election : गडचिरोली लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ आदिवासी समाजासाठी आरक्षित आहे. त्यामुळे इतरांना येथे लढण्याची संधीच मिळत नाही.
Vidhan Bhavan
Vidhan BhavanSarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli Political News : समाजासाठी राखीव आहे. आदिवासी समाजाच्या इतर समाजाला उमेदवाराला येथून निवडणूक लढता येत नाही. भाजपासाठी झटणारे इतर समाजातील शेकडो कार्यकर्ते येथे कार्यरत आहेत.

हे लक्षात घेऊन गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी होऊ लागली आहे. गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी भाजपच्या नेत्यांकडे ही मागणी केली आहे.

गडचिरोली Gadchiroli लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ आदिवासी समाजासाठी आरक्षित आहे. त्यामुळे इतरांना येथे लढण्याची संधीच मिळत नाही. भाजपचे शेकडो कार्यकर्ते अनेक वर्षांपासून पक्षाचे काम करीत आहेत. त्यांना आमदार आणि खासदार होता येत नाही.

ही प्रमुख अडचण लक्षात घेता विधान परिषदेच्या ११ जागांपैकी एका जागेवर गडचिरोली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा विचार केला जावा. तशी मागणी त्यांनी भाजपच्या नेत्यांकडे केली आहे.

Vidhan Bhavan
Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange : मनोज जरांगे म्हणाले राजकीय कारकीर्द संपवणार; भुजबळांनी एका वाक्यातच विषय संपवला...

गडचिरोलीतील मतदार भाजपला सातत्याने साथ देत आहेत. यावेळी लोकसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपचे उमेदवार अशोक नेते पराभूत झाले आहेत. त्यापूर्वी ते तीन वेळा निवडून आले होते. निष्ठावान कार्यकर्ते आणि त्यांची मेहनत हे भाजपचे गडचिरोली जिल्ह्यात भांडवल आहे. येथील प्रामाणिक कार्यकर्त्यांना राज्याच्या विधिमंडळात जाण्याची संधी देण्याची गरज आहे.

गडचिरोली मागास जिल्हा आहे. आमदारांची संख्या वाढल्यास अधिकचा निधी मिळेल आणि जिल्ह्याच्या विकासालाही हातभार लागले. मागास जिल्ह्यातून एका कार्यकर्त्याला विधान परिषदेवर नियुक्त केल्यास समाजात एक चांगला संदेश जाईल आणि भाजपबद्धल सहानुभूती निर्माण होईल असे आमदार डॉ. होळी यांचे म्हणणे आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Vidhan Bhavan
Chhagan Bhujbal On OBC Meeting : मुख्यमंत्री शिंदेंसोबतची बैठक संपल्यानंतर आक्रमक भुजबळांचं मोठं विधान

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com