MLA Dhanorkar News : आमदार प्रतिभा धानोरकर काँग्रेस सोडणार नाहीत, पंजावर लढणार लोकसभा !

Balu Dhanorkar : बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला.
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkarsarkarnama

MLA Dhanorkar News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. त्यांच्यासोबत १७ आमदार कॉँग्रेस सोडून जाणार असल्याच्या चर्चांना पेव फुटले आहे. या १७ जणांच्या यादीत चंद्रपूर जिल्ह्यातील वरोऱ्याच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांचे नाव घेतले जात आहे.

यासंदर्भात आमदार धानोरकर यांनी आज (ता. 12) ‘सरकारनामा’ला सांगितले की, काँग्रेस पक्ष सोडून जाण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही. आम्ही काँग्रेसचे आहोत आणि अखेरपर्यंत काँग्रेसमध्येच राहणार आहोत. कारण काँग्रेसने आम्हाला काय नाही दिले? खासदारकी दिली, आमदारकी दिली. माझे दिवंगत पती बाळू धानोरकर यांनी चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघातून ऐतिहासिक विजय मिळवला.

Pratibha Dhanorkar
Balu Dhanorkar News : ...अखेर खासदार बाळू धानोरकरांचं 'ते' स्वप्नं त्यांच्या स्वीय सहाय्यकानं केलं पूर्ण!

महाराष्ट्रातून कॉँग्रेसचे ते एकमेव खासदार ठरले. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत, यवतमाळ जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत व इतर सर्व निवडणुकींमध्ये त्यांनी पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. त्यांच्याच नेतृत्वात आम्ही लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामे करू शकतो. अशा पक्षासोबत बेईमानी करून इतर पक्षात जाण्याचा विचारही आम्ही करू शकत नाही. जे सोडून गेले त्यांना शुभेच्छा, असे आमदार धानोरकर म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाकडून तुम्हाला चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघात लढण्याची ऑफर आहे का, असे विचारले असता, भाजपमध्ये आधीचीच खूप गर्दी आहे आणि इतर एक-एक पक्ष फोडून फोडून त्यांनी ही गर्दी आणखी वाढवली. एवढ्या गर्दीत कुणाचा टिकाव लागेल, हे सांगता येत नाही. भाजपचे मूळ कार्यकर्तेच पक्षावर नाराज आहेत. वर्षानुवर्षे पक्षाची सेवा करून निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. आता आयारामांना पदे दिली जात आहेत आणि यापुढेही दिली जातील. त्यामुळे भाजपमधील खदखद एक दिवस बाहेर पडणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

पक्षनिष्ठा ठेवणाऱ्यांना निष्ठेचे फळ एक ना एक दिवस मिळतेच. पण गद्दारांचे हाल खराब होतात. हा अनुभव सोडून गेलेले लोक घेतील. आम्ही कॉँग्रेससोबत निष्ठावान आणि आमच्यासोबत आमचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेसच्या चिन्हावर लढवणार आणि विजयीसुद्धा होणार, असे आमदार धानोरकर म्हणाल्या. वरोरा विधानसभा मतदारसंघाबाबत काय असे विचारले असता, त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील आणि त्या निवडणुकीला वेळ आहे. सध्या पहिले लक्ष्य लोकसभा, असेही आमदार धानोरकर यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com