Balu Dhanorkar News : ...अखेर खासदार बाळू धानोरकरांचं 'ते' स्वप्नं त्यांच्या स्वीय सहाय्यकानं केलं पूर्ण!

Congress Political News : एका स्वीय सहाय्यकाने आपल्या लाडक्या साहेबांसाठी केलेले हे कार्य विरळेच म्हणावे लागेल.
Balu Dhanorkar
Balu Dhanorkar Sarkatnama
Published on
Updated on

Chandrapur : काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकरांचे ३० मे २०२३ रोजी निधन झाले आणि त्यांची स्वप्ने अधुरे राहिली. धानोरकरांचे स्वप्ने त्यांचे स्वीय सहायक गोविल मेहरकुरे हे जवळून बघत होते. साहेबांच्या निधनाने ते दु:खी झाले. परंतु, साहेबांच्या इच्छापूर्तीसाठी खारीचा वाटा म्हणून विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. आणि अवघ्या १५ दिवसांत अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली. एका स्वीय सहाय्यकाने आपल्या लाडक्या साहेबांसाठी केलेले हे कार्य विरळेच म्हणावे लागेल.

स्वीय सहायक गोविल मेहरकुरे यांनी काँग्रेस(Congress) चे दिवंगत खासदार बाळू धानोरकरांच्या इच्छापूर्तीची माहिती काँग्रेसचे माजी नगरसेवक गोपाल अमृतकर यांना दिली. परंतू, अभ्यासिका म्हणजे भलेमोठे सभागृह, तेथील साधन सामग्री असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. यानंतर मेहरकुरे यांनी आपले मामाश्री अशोक कोटकर यांना या विषयाची माहिती दिली. त्यानंतर कोटकर यांनी क्षणाचाही विलंब न करता अभ्यासिकेसाठी दोन हजार स्केअर फुटाचे सभागृह देण्याचे मान्य केले.

Balu Dhanorkar
Congress Working Committee: काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची घोषणा; महाराष्ट्रातील 'या' नेत्यांना महत्वाचे स्थान

खासदार बाळू धानोरकरां(Balu Dhanorkar)वर प्रेम करणाऱ्यांची यादी स्वीय सहाय्यक गोविल मेहरकुरे, गोपाल अमृतकर यांनी तयार केली. त्यांच्या भेटी घेतल्या. बाळूभाऊंच्या स्वप्नपूर्तीची माहिती दिली. बघता बघता या लोकनेत्याच्या स्वप्नपूर्तीसाठी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांनी लाखो रुपयांचा निधी गोळा केला. अवघ्या पंधरा दिवसांत अभ्यासिका पूर्णत्वास आली. दिल्ली येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे यांच्या हस्ते अभ्यासिकाचे उद्घाटन झाले.

यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar), आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार देवराव भांडेकर,नगराध्यक्ष अनिल धानोरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, राष्ट्रवादा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शिवसेना (उबाठा) जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हे, अनिरुद्ध वनकर उपस्थित होते.

Balu Dhanorkar
Maharashtra Politics: ठाकरे गटाचा भोसरीसह खेड-आळंदी विधानसभा जागेवर दावा; शिरूर-हवेली जुन्नरही लढण्याच्या तयारीत

दिवंगत खासदार बाळू धानोरकर म्हणजे रोखठोक व्यक्तिमत्व. गरिबीची जाण असलेला नेता. केवळ समाजसेवा म्हणून राजकारण करणारा पुढारी. अशी अनेक बिरुदावली त्यांच्यासमोर लावता येतील. अधिकारी असो वा अन्याय करणारा यांची क्षणात बोलती करणारा हा नेता तेवढाच भावनिकसुद्धा होता. गरीब कुटुंबातील मुले शिकली पाहिजे. त्यांची प्रगती झाली पाहिजे. या विद्यार्थ्यांना कोणतीच अडचण भासू नये, त्यासाठी अभ्यासिका असो वा कोणतीही साधन सुविधा पुरविली पाहिजे, हाच त्यांचा आग्रह होता.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com