Dheeraj Lingade News : काय सांगता? काँग्रेस आमदार पोलिस ठाण्यासमोर थाटणार मटक्याचं दुकान? नेमकं काय झालं ?

Maharashtra Politics : आमदारांनीच मटक्याचं दुकान सुरू करणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Dheeraj Lingade News
Dheeraj Lingade News Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana : बुलडाणा शहरात अवैध धंदे दिवसेंदिवस वाढत असून, गुन्हेगारीचा आलेख उंचावला आहे. नागरिकांनी याबाबत लोकप्रतिनिधी, पोलिस प्रशासनाकडे सतत तक्रारीही केल्या आहेत, पण पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. परिसरातील अवैध धंदे, गुंडगिरीला शहरातील जनता त्रस्त झाली आहे.

नागरिकांनी केलेल्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या पोलिसांना विधान परिषदेचे आमदार धीरज लिंगाडे यांनी अजब अल्टिमेटम दिला आहे. त्याची चर्चा सध्या अमरावती जिल्ह्यात सुरू आहे. धीरज लिंगाडे यांनी बुलडाणा पोलिसांना एक अजब अल्टिमेटम दिला आहे.

Dheeraj Lingade News
Thackeray Group Vs BJP : ठाकरे गट भाजपाच्या विरोधात गावभर दिंडोरा पिटणार; सांगलीत 'होऊ दे चर्चा' रंगणार

"जिल्हा पोलिस प्रशासनाला एका आठवड्यात बुलडाणा शहरातील अवैध धंदे व मटक्यांची दुकाने बंद करावीत,अन्यथा आम्ही बुलडाणा शहर पोलिस ठाण्यामोर मटक्याची दुकाने लावू ," असा इशारा लिंगाडे यांनी पोलिसांना दिला आहे. आमदार लिंगाडे यांनी अवैध धंदे बंद करण्यासाठी आक्रमक होणे हे आपण समजू शकतो, पण आमदारांनीच मटक्याचं दुकान सुरू करणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

अमरावती पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत धीरज लिंगाडे जायंट किलर ठरले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून काँग्रेसमध्ये प्रवेश करत त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले आहे. धीरज लिंगाडे यांनी भाजपचे उमेदवार व माजी गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांचा पराभव केला आहे.

कोण आहेत धीरज लिंगाडे...

धीरज लिंगाडे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख होते. मात्र, अमरावतीची जागा काँग्रेसकडे गेल्याने धीरज लिंगाडे यांनी ऐन निवडणुकीत काँग्रेस पक्षात प्रवेश करून अमरावतीचे तिकीट मिळविले. लिंगाडे हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते होते. बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे शिंदे गटासोबत गेल्यानंतर अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून शिंदे गटात प्रवेश केला. मात्र, धीरज लिंगाडे मातोश्रीशी एकनिष्ठ राहत उद्धव ठाकरेंसोबत राहिले होते. अमरावतीच्या जागेसाठी काँग्रेसने आग्रह धरल्याने शिवसेनेला माघारी घ्यावी लागली. लिंगाडे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीट मिळवले.

Edited By : Mangesh Mahale

Dheeraj Lingade News
Killari Earthquake Thirty Years : लातूरकरांना भूकंप झाल्याची माहिती होण्याआधी शरद पवार किल्लारीत होते...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com