MLA Wajahat Mirza : २५ लाखांच्या लाच प्रकरणी आमदार डॉ. वजाहत मिर्झांची पुन्हा चौकशी होणार?

Pusad : आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झालेला आहे.
Dr. Wajahat Mirza
Dr. Wajahat MirzaSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal District's Pusad MLC Dr. Wajahat Mirza News : विधानसभा किंवा विधानसपरिषदेमध्ये प्रश्‍न उपस्थित करणे किंवा न करणे, यासाठी आमदार लाच घेतात, हा मुद्दा एकेकाळी चांगलाच गाजला होता. त्यावर बरेच वादविवादही झाले. आता पुन्हा हा मुद्दा उपस्थित होण्याचे कारण म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील पुसदचे कॉंग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप झालेला आहे. (MLAs taking bribes was once a well-known issue)

विधान परिषदेत प्रश्न उपस्थित न करण्यासाठी आमदाराच्या नावे आरटीओकडून २५ लाखांची लाच घेतल्याच्या प्रकरणात गुरुवारी (ता. ४) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) विधानपरिषदेचे कॉंग्रेसचे पुसद येथील आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची आठ तास चौकशी केली गेली. आता त्यांनी दिलेली साक्ष आणि इतरांची साक्ष तपासून त्यात फरक आढळल्यास आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांची पुन्हा चौकशी होण्याची शक्यता आहे.

दीड महिन्यांपूर्वी रविभवन परिसरात दिलीप वामनराव खोडे (वय ५० रा. वूड रोज हिरानंदानी मिडास,वसंत विहार, ठाणे) याला एसीबीच्या पथकाने लाच घेताना रंगेहात अटक केली होती. एसीबीच्या पथकाने न्यायालयात (Court) हजर करून त्याची १ एप्रिलपर्यंत एसीबी कोठडी घेतली. कोठडीत असताना खोडेची कसून चौकशी करण्यात आली. याशिवाय तक्रारदार आरटीओचीही पुन्हा चौकशी करण्यात आली.

सुरुवातीला वारंवार खोडे हा तक्रारदार आरटीओच्या मोबाइलवर संपर्क करीत होता. त्याने दोन निवृत्त आरटीओ अधिकाऱ्याशी संपर्क साधला. त्याला खोडेशी बोलणे करायला लावले होते. दरम्यान महिला अधिकाऱ्याने केलेली चारित्र्य हननाच्या तक्रारीचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करण्यात येणार आहे. हा प्रश्न उपस्थित न करण्यासाठी खोडे याने सुरुवातीला आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या नावे एक कोटीची लाच मागितली.

Dr. Wajahat Mirza
Bhavana Gawali : भावनाताईंचे देऊळ पाण्यात? भूतकाळातील वाद अन् ठाकरेंची सोडलेली साथ भोवणार...? बंजारा कार्डवर ठरणार गेम…

त्यानंतर २५ लाख रुपये द्या, असे खोडे हा तक्रारदाराला म्हणाला. त्यातून या प्रकरणात डॉ. मिर्झा यांची चौकशी करण्याची शक्यता एसीबीकडून वर्तविण्यात येत होती. त्यानुसार गुरुवारी एसीबीद्वारे त्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आले. आठ तास चौकशी केल्यावर त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. मात्र, आतापर्यंत या प्रकरणात आरोपींसह नोंदविण्यात आलेल्या इतर व्यक्तींची साक्ष आणि आमदार डॉ. मिर्झा यांची साक्ष यात तफावत आढळल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलाविण्याची शक्यता आहे.

अकरा जणांची झाली साक्ष..

एसीबीद्वारे (ACB) आतापर्यंत २५ लाखाच्या लाच प्रकरणात ११ जणांची साक्ष नोंदविली गेली आहे. यामध्ये आमदार (MLA) डॉ. वजाहत मिर्झा, आरोपी खोडे आणि त्याचा सहकारी, दोन आरटीओ (RTO) अधिकारी आणि रविभवन येथील सहा जणांचा समावेश आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com