MLA Keche-Wankhade War : चार-पाच महिन्यांपासून सुरू होता वाद, अति झाल्यामुळे आला चव्हाट्यावर !

Arvi : निधी आणण्यावरून दोघांत वाद झाला.
Dadarao Keche and Sumit Wankhade
Dadarao Keche and Sumit WankhadeSarkarnama

Wardha District's Arvi News : वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघात आमदार दादाराव केचे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव सुमीत वानखडे हे मिळून मिसळून काम करायचे. पण नंतर नंतर मतदारसंघात निधी आणण्यावरून दोघांत वाद झाला आणि काल-परवा तो विकोपाला गेला. त्यानंतर आमदार केचे यांनी थेट फडणवीसांना राजीनामा देण्याचा इशारा देऊन टाकला. (Huge funds were also brought from the government)

झाले असे की, फडणवीसांचे खासगी सचिव म्हणून काम करताना सुमीत वानखडे यांचा जास्तीत जास्त वावर मंत्रालयात आहे. त्यांचे मूळ गाव आर्वी तर सासुरवाडी वर्धेची आहे. मूळ गावी आर्वीला त्यांचे नेहमीच जाणे-येणे असते. त्यात त्यांनी गावातील लोकांच्या समस्यांवर लक्ष देणे सुरू केले आणि त्यासाठी सरकारकडून भरघोस निधीसुद्धा आणला आहे. लोकांना आपलेसे करण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत.

आर्वीमध्ये नियमित काम करीत असताना आपणही आमदार होऊ शकतो, असा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यांनी मग त्या दिशेने झपाझप पावले टाकायला सुरुवात केली. आमदारांपेक्षाही जास्त निधी त्यांनी मतदारसंघासाठी आणला. एक वेळ अशी आली की आमदारांच्या पत्रावर नाही, तर सुमीत वानखेडेंच्या पत्रावर निधी यायला लागला. परिणामी केचेंची चिडचिड वाढली. अति झाल्यावर केचेंच्या भावनांचा उद्रेक झाला आणि त्यांनी थेट फडणवीसांना पत्र लिहून राजीनाम्याचा इशारा देऊन टाकला.

आमदाराचे पत्र नसताना निधी येतो कसा, असा सवाल करत आमदार केचे संतप्त झालेले आहेत. आमदार मी आहे की सुमीत वानखडे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे. या मतदारसंघात भाजपजवळ (BJP) एकही कार्यकर्ता नसताना मी काम सुरू केले आणि मतदारसंघ खेचून आणला आणि आता अशा पद्धतीने राजकारण होत असेल, तर विचार करावा लागेल, असे आमदार केचेंचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त होऊन त्यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे.

Dadarao Keche and Sumit Wankhade
Fadanvis News : आमदार ऐकत नाहीत फडणवीसांचा सल्ला, उमेदवारी मिळण्यात अडचण येणार ?

फडणवीसांचे (Devendra Fadanvis) एक पीए यापूर्वी आमदार झाले आहेत. त्यानंतर पुढचा नंबर सुमीत वानखडे यांचा आहे, अशी चर्चा वर्धा जिल्ह्यात (Wardha) सुरू झाली आहे. राजकारणाच्या (Politics) हवेची दिशा तिकडे इशारा करत आहे. त्यामुळे आमदारांची चिडचिड अधिकच वाढली. एकंदरीतच काय तर सुमीत वानखडेंच्या प्रभावापुढे आमदार दादाराव केचे निष्प्रभ होताना दिसत आहेत. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या दोघांमधला वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. फक्त मागील दोन दिवसांत तो चव्हाट्यावर आल्याने आर्वीतील वातावरण तापले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com