Fadanvis News : आमदार ऐकत नाहीत फडणवीसांचा सल्ला, उमेदवारी मिळण्यात अडचण येणार ?

BJP : स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी एक नव्हे तर दोन वेळा दिला.
Devendra Fadanvis
Devendra FadanvisSarkarnama

Deputy Chief Minister Devendra Fadnavis News : सोशल मिडियावर ज्यांचे किमान २५ हजार फॉलोअर्स नाहीत, अशांना आगामी निवडणुकीत उमेदवारी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देवेंद्र फडणवीस यांनी एक नव्हे तर दोन वेळा दिला. पण त्यांचा हा इशारा पक्षाचे नागपुरातील नेते व आमदारांना गांभीर्याने घेतला नसल्याचे दिसते आहे. (A clear warning was given by Devendra Fadnavis)

गेल्या काही वर्षांत नेत्यांचा कार्यकर्त्यांसोबत संपर्क व प्रचाराच्या तंत्रात आमूलाग्र बदल झाला असून सोशल मिडियाची यात मोठी भूमिका आहे. सोशल मिडियाच्या ताकदीचा अनुभव सर्वच नेत्यांनी घेतला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेत्यांना सोशल मीडियावर सक्रिय होण्याचे आवाहन केले होते.

नागपुरातील अनेक भाजप नेते, आमदारांचे सोशल मीडिया अकाऊंट आहे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला या नेत्यांनी गांभीर्याने घेतला नसल्याचे त्यांच्या फॉलोअर्सच्या संख्येवरून दिसत आहे. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला. भाजप केंद्रात सत्तेत आल्याच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे सोशल मीडियाही आहे.

त्याचाच परिणाम म्हणून देशातील सर्वच भाजप नेत्यांनी त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट उघडण्यावर तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला. भाजपच्या प्रत्येक राज्यातील यशात फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्‍सॲप या सोशल मीडिया टूलचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. केलेली कामे, एखाद्या मुद्द्यावर स्पष्ट मत, पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम, धोरण, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजप नेत्यांनी सोशल मीडियाचा वापर केला किंबहुना आजही करत आहेत.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis : काहीजण दुसऱ्याच्या घरात पोरगा झाला म्हणून आनंदी | Congress | Sarkarnama

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे फेसबुकवर २० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर ट्विटरवर १ कोटीपेक्षा जास्त फॉलोअर्स दिसतात. देवेंद्र फडणवीस यांचे फेसबुकवर ९० लाख तर ट्विटरवर पाच लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. शहरातील या दोन्ही भाजप नेत्यांच्या तुलनेत शहरातील आमदार व इतर नेत्यांचे फॉलोअर्स फारच अत्यल्प आहेत. ही बाब ओळखून अधिवेशन काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मीनगरातील हॉटेल अशोकमध्ये बैठकीत नेते, आमदारांना सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढविण्याचा सल्ला दिला होता.

मागील फेब्रुवारीमध्येही त्यांनी नाशिकमध्ये भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत कमी फॉलोअर्स असलेल्यांना उमेदवारीच मिळणार नसल्याचा इशारा दिला होता. परंतु त्यांचा सल्ला वजा इशाऱ्याचा फारसा परिणाम नागपुरातील आमदार व इतर नेत्यांवर झाल्याचे दिसत नाही. शहरात फेसबुक पेजवर सर्वात कमी ९ हजार फॉलोअर्स आमदार विकास कुंभारे यांचे आहेत.

Devendra Fadanvis
Devendra Fadanvis on PCMC: पिंपरी-चिंचवडच्या पाण्यावर फडणवीसांनी काढला 'हा' तोडगा

फेसबुकवर कुणाचे किती फॉलोअर्स..

आमदार प्रवीण दटके १४ हजारावर (तीन फेसबुक पेज), आमदार कृष्णा खोपडे १४ हजार, आमदार विकास कुंभारे ९ हजार, आमदार मोहन मते २२ हजार, माजी महापौर दयाशंकर तिवारी ५ हजार (दोन फेसबुक पेज), माजी आमदार प्रा. अनिल सोले साडेसात हजार (दोन फेसबुक पेज), माजी आमदार गिरीश व्यास ४ हजार.

काय म्हणाले होते फडणवीस?

निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्यांची सोशल मीडियावर दररोज पोस्ट नाही, ट्विट नाही तसेच ज्यांना किमान २५ हजार फॉलोअर्स नाहीत, अशांना उमेदवारीच मिळणार नसल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी फेब्रुवारीत नाशिकमध्ये (Nasik) तर त्यापूर्वी हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपुरात (Nagpur) पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत स्पष्ट केले होते.

Devendra Fadanvis
Nagpur BJP News : गडकरी आणि फडणवीसांसोबत उत्तम ताळमेळ, प्रवीण दटकेच राहणार भाजपचे अध्यक्ष ?

अनेक नेते तळागाळात काम करतात. जनसेवेची कामे करताना त्यांना वेळ मिळत नाही. त्यामुळे अनेकांनी एजन्सीला कामे दिली. परंतु एजन्सी केवळ पगारी असल्याने त्यांना गांभीर्य नसते. नेत्यांनी संघटनेतील कार्यकर्ते किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांची मदत घेतल्यास सोशल मीडिया फॉलोअर्स वाढवता येऊ शकतात, असे भाजपचे (BJP) प्रदेश सोशल मीडिया सहसंयोजक लकीसिंग चावला यांनी सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com