Panchayat Samiti : आढावा बैठकीत आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची शाळा

Zilla Parishad Politics : मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रश्नांनी अधिकाऱ्यांना फुटला घाम
Gondia Zilla Parishad
Gondia Zilla ParishadSarkarnama
Published on
Updated on

Sadak Arjuni Meeting : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी पंचायत समितीच्या आमसभेची आढावा बैठक यंदा चांगलीच गाजली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी चक्क भरल्या सभेत अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. आमदारांना उत्तर देताना अधिकाऱ्यांना चांगलाच घाम फुटला.

आमदारांची ही आमसभा अधिकारांची शाळा घेण्यासाठी होती अशी चर्चा आता जिल्ह्यात होऊ लागली आहे. सडक अर्जुनी पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या गावांच्या विकास कामांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक आशीर्वाद लॉन येथे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची आमसभा घेण्यात आली. या आमसभेत अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधानकारक माहिती सादर न केल्याने आमदार चंद्रिकापुरे यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले.

Gondia Zilla Parishad
Gondia OBC News : ओबीसीच्या जनगणनेसाठी जिल्ह्यात पोहोचली यात्रा !

पंचायत समितीच्या आमसभेला जिल्हा परिषदेचे अधिकारी, पंचायत समितीचे विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सडक अर्जुनी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाअंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी आवास योजनेअंतर्गत सडक अर्जुनी तालुक्यात आतापर्यंत शासनाच्या माध्यमातून 10 हजार 607 घरकुलांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यात 9 हजार 974 घरकुलांचे कामे सुरू आहेत. त्यापैकी 9 हजार 201 घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यातील तालुक्यातील काही गावात गृहनिर्माण अभियंत्यांनी, आपल्या मर्जीने काही लाभार्थ्यांना घरकुल न बांधता पैसे दिल्याची माहिती पुढे आल्याने आमदारांनी घरकुल न बांधताच पैसे दिले, त्याचे काय? असा प्रश्न विचारला. त्यावर नोडल अधिकाऱ्यांनी मौन धारण केले. काही गावात घरकुल बांधकाम करताना ग्रामपंचायतचा नमुना आठ देऊन, त्याच ठिकाणी घरकुल बांधायला पाहिजे होते. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी साठगाट केल्याने नमुना आठ कुठला आणि घरकुलाचे बांधकाम भलत्याच ठिकाणी केल्याची बाब पुढे आली आहे. असे चुकीचे काम करणाऱ्या गृहनिर्माण अभियत्यांकडून वसुली करून, निलंबित करण्याचां ठराव आमसभेत घेण्यात आला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आसमभेत सरपंच परशुरामकर यांनी आरोग्य विभाग, पाणीपुरवठा, वीज वितरण विभाग, लघुपाटबंधारे विभाग, पंचायत समिती विभाग, घरकुल बांधकाम या विभागांचे विविध प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्यांची पोलखोल केली. ठेकेदाराने ठेकेदारांसाठी राबविलेली योजना म्हणजे जलजीवन मिशन, अशा शब्दात परशुरामकर यांनी पाणीपुरवठा विभागाची पोलखोल केली. या सर्व घडामोडीने ही आमसभा चांगलीच गाजली. यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष यशवंत गणवीर, पंचायत समिति सभापती संगीता खोब्रागडे, जिल्हा परिषद सदस्य कविता रंगारी, भूमेश्वर पटले, निशा तोडासे, पंचयत समिति उपसभापती शालिंदर कापगते यांनीही चर्चेत सहभाग घेतला.

Edited By : Prasannaa Jakate

Gondia Zilla Parishad
Gondia News : पोषण आहाराबाबत कर्मचारी ‘अपडेट’ झालेच नाहीत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com