MLA Mitkari's Initiative : आता शेतकऱ्यांना नाही लावावी लागणार जिवाची बाजी, आमदार मिटकरींनी घेतला पुढाकार !

CEO Vaishnavi : सीईओ वैष्णवी बी आज प्रत्यक्ष निर्गुणा नदीच्या पात्राजवळच्या परिसराची पाहणी केली.
MLA Amol Mitkari and Others
MLA Amol Mitkari and OthersSarkarnama
Published on
Updated on

MLA Mitkari's Initiative : बाळापूर तालुक्यातील कुपटा या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी निर्गुणा नदीचे पात्र ओलांडून जावे लागते. शेतीचे साहित्य शेतात नेतांना आणि शेतमाल परत आणतांना अक्षरशः जिवाची बाजी लावावी लागते.

बैलजोडी, बैलगाडी, ट्रॅक्टर ही साधने शेतामध्ये पोहोचत नाहीत. त्यामुळे शेतीही नीट करता येत नाही. याबाबत आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सीईओ वैष्णवी बी. यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आज (ता.8) प्रत्यक्ष नदीपात्राजवळ पोहोचून समस्येची पाहणी केली व लवकरात लवकर ही समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

MLA Amol Mitkari and Others
Akola Police : 700 शूटर्स असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या तस्करांना अकोल्यात अटक

आमदार मिटकरी यांनी शासन निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. कुपटा या गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात पोहोचण्यासाठी निर्गुणा नदीचे पात्र ओलांडून जावे लागते व त्यांना कधी कधी रात्रीच्या अंधारात या पात्रातून परतावे लागते. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला कुपटा येथील शेतकऱ्यांचा हा जीवघेणा प्रवास थांबावा, यासाठी आमदार अमोल मिटकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संदीप पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे समस्या मांडली.

सीईओ वैष्णवी बी आज प्रत्यक्ष निर्गुणा नदीच्या पात्राजवळच्या परिसराची पाहणी केली. निर्गुणा नदीचे पात्र बरेच रुंद असून या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी असते. सहजपणे पोहून जाणे या पात्रातून शक्य नाही. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या शेतीच्या कामाचे साहित्य, बी-बियाणे, एका डोंग्याच्या सहाय्याने नदीच्या पात्रातून घेऊन जातात. हा डोंगा सुद्धा दर्जेदार नव्हे तर रिकाम्या टाक्यांपासून बनविलेला आहे, म्हणजेच तो कधीही धोकादायक ठरू शकतो.

याच डोंग्यावरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील माल नदीपात्रातून घरापर्यंत आणावा लागतो. महिला मजुरांनासुद्धा या धोकादायक डोंग्यातून नदीचे पात्र पार करावे लागते. ही सर्व परिस्थिती आमदार मिटकरी, संदीप पाटील यांनी गुरुवारी जि.प. सीईओ वैष्णवी बी. यांना प्रत्यक्ष दाखवून दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे संबंधित विभागाचे अधिकारी, बीडीओ, सरपंच, जि.प. सदस्य यांची उपस्थिती होती. यावेळी जीप सीईओ यांनी सांगितले की जिल्हा परिषदेच्या अधिकारात होऊ शकणाऱ्या उपाययोजना तातडीने करण्यासाठी आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देशित करू व लवकरच कामाला प्रारंभ करू.

आमदार मिटकरी यांनी यावेळी सांगितले की, ज्या कामासाठी शासकीय निधीची गरज आहे, त्या कामासाठी आपण पाहिजे तेवढा शासकीय निधी उपलब्ध करून देऊ. त्यामुळे आता लवकरच कुपटा येथील शेतकऱ्यांना निर्गुणा नदीचे पात्र ओलांडून जाण्यासाठी पुलाची निर्मिती होऊ शकणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जीवाशी सुरू असलेला खेळ थांबायला हवा..

गेल्या अनेक वर्षांपासून कुपटा या गावातील शेतकऱ्यांचा निर्गुणा नदी पात्रातून सुरू असलेला हा जीवाशी खेळ आता थांबायला हवा, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे. नदीपात्रातून शेतकरी, शेतमजूरांना जाता यायला हवे. शिवाय शेतीच्या कामासाठी बैल जोडी, बैलगाडी, ट्रॅक्टरसुद्धा नदीपात्र ओलांडून शेतापर्यंत पोहोचावे, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com