Akola Police : 700 शूटर्स असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या तस्करांना अकोल्यात अटक

IPS Bachchan Singh : मार्च महिन्यात देणार होते एकाला ‘डिलिव्हरी’
Akola Police Raid
Akola Police RaidSarkarnama
Published on
Updated on

Akot Raid : अकोल्यातील अकोट पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शस्त्रांची तस्करी करणाऱ्या तीन जणांना अकोट पोलिसांनी बंदूक व काडतुसांसह अटक केली. धक्कादायक म्हणजे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या मदतीने ही शस्त्र तस्करी करण्यात आल्याची माहिती आहे. यातील एका आरोपीने लॉरेन्स याचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्यासोबत ऑडीओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे तपासात प्रथमदर्शनी समोर आल्याची माहिती अकोल्याचे पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली.

16 जानेवारी 2024 रोजी पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला दरम्यान अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याच्या पुलाखाली केशरी रंगाच्या पल्सर मोटरसायकलवर दोघांजवळ बंदूक असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे पीएसआय जवरे यांनी कारवाई करीत दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळ एक रिकामे मॅक्झिन मिळाले.

Akola Police Raid
Akola : IPS बच्चन सिंग, जिथे गेले ठरले ‘किंग’; अकोल्यात गुन्हेगारांची उतरविणार का झिंग?

पोलिसांनी या आरोपींची आणखी चौकशी केल्यानंतर आरोपींनी विहिरीत टाकलेले दोन देशी कट्टे व नऊ जीवंत राऊंड वीर एकलव्य आपत्कालीन पथकाच्या मदतीने जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अजय तुलाराम देठे (वय 27 वर्ष, रा. धोबीपुरा अकोट), प्रफुल्ल विनायक चव्हाण (वय 25 वर्ष, रा. अडगांव बु., ता. तेल्हारा जि. अकोला) यालाही बेड्या ठोकल्या.

गुन्ह्याच्या तपासात 'मास्टरमाइंड' असलेला तिसरा आरोपी शुभम रामेश्वर लोणकर (वय 25 वर्ष, रा. नेवरी ता. अकोट, जि. अकोला ह. मु. भालेकर वस्ती, वारजे, पुणे) याचा शोध पोलिसांनी सुरू केला. याला पोलीसांनी मध्य प्रदेशातील उजैनमध्ये शोधले. मात्र तो पसार झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला भालेकर वस्ती वारजे, पुणे येथुन अटक केली. त्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली. शुभम लोणकर याच्या मोबाईलवरून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडीओ कॉल केल्याचा पुरावा सापडला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लॉरेन्स बिष्णोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईसोबत ऑडीओ कॉल व इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. अकोट पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. शस्त्रांची तस्करी नेमकी कशासाठी ? व्हिडिओ कॉल मध्ये लॉरेन्स बिष्णोई सारखा दिसणारा तोच आहे का? अधिक आरोपी या प्रकरणात आहेत का? ही टोळी कधी पासून सक्रिय आहे अशा अनेक प्रश्नांची आता तपासात उकल होण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक बच्चन सिंग, अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, सहाय्यक पोलिस अधीक्षक अनमोल मित्तल, गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर शेळके, अकोट पोलिस स्टेशनचे ठाणेदार तपन कोल्हे, सहाय्यक पोलिस निरीक्षक कैलास भगत, उपनिरीक्षक राजेश जवरे, उपनिरीक्षक अख्तर शेख, उपनिरीक्षक गोपाल जाधव, हेडकॉस्टेबल चंद्रप्रकाश सोळंके, कॉस्टेबल विशाल हिवरे, मनीष कुलट, प्रेमानंद पचांग, रवी सदांशिव, सागर मोरे, कपील राठोड, अब्दुल माजीद, वसीमोद्दीन, चालक उपनिरीक्षक वासुदेव धर्मे, चालक संदीप तायडे यांनी ही कारवाई केली.

Akola Police Raid
Akola Crime news | ठाकरे गटाचे महानगराध्यक्ष राजेश मिश्रा यांच्यावर प्राणघातक हल्ला

कोण आहे लॉरेन्स बिष्णाई?

लॉरेन्स बिश्नोई हा एक कुख्यात गँगस्टर आहे. त्याच्या प्रेयसीची हत्या झाल्याचे समजताच याचा बदला घेण्यासाठी तो गुन्हेगारीच्या जगात आल्याचे बोलले जाते. त्याच्यावर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत. त्याची टोळी देशभरातील 700 शूटर्सशी संलग्न असल्याचा संशय आहे. गँगस्टर बिश्नोई हा 7 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे. एवढेच नाही तर या टोळीकडे लाखो रुपयांच्या हायटेक बंदुका असून त्यांची ऑनलाइन विक्रीही केली जाते. तो देशातील कोणत्याही तुरुंगात गेला असला, तरी तेथे तो आलिशान जीवन जगतो. बिश्नोई टोळीत भारतातील 5 राज्यांमधील 700 नेमबाज काम करीत आहेत.

लॉरेन्सचे भारताबाहेरही नेटवर्क आहे. लॉरेन्सशी संबंधित लोक सांगतात की, तो त्याचा लहान भाऊ अनमोलवर खूप प्रेम करतो. आपल्या धाकट्या भावासाठी घर बांधण्याचे त्यांचे स्वप्न होते. दरम्यान तो सध्या तिहार तुरुंगात कोठडीत आहे. 2018 मध्ये बिश्नोईचा जवळचा सहकारी संपत नेहरा याने अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानाची रेकी केली होती. सलमानची हत्या करण्याचे काम संपतला देण्यात आले होते. या मागील कारण म्हणजे, बिश्नोई समाज काळ्या हरणाच्या प्रजातीला पवित्र मानतो. सलमानने काळविटाची शिकार केली होती.

Akola Police Raid
Akola : पोलिस महासंचालक विवेक फणसळकर आणि अकोल्याचे नाते...

29 मे 2022 रोजी पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांची पंजाबमधील मानसा येथे गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर काही तासांनी गोळीबाराची जबाबदारी गोल्डी ब्रारने स्वीकारली होती. गोल्डीने बिश्नोईसोबत हा कट रचल्याचे म्हटले होते. 21 सप्टेंबर 2023 रोजी बिश्नोईने खलिस्तानी दहशतवादी सुखदूल सिंगच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. बिष्णोईच्या टोळी सोबत यांचे टोळीयुद्ध नेहमी चालायचे. त्यामुळे विश्नोईचे नाव खलीस्तानवादी चळवळीबाबतही घेतले जाते.

Edited By : Prasannaa Jakate

Akola Police Raid
Rashmi Shukla : महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलिस महासंचालक ठरल्या रश्मी शुक्ला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com