Ravi Rana News: भाजपचा धक्कादायक निर्णय; 'युवा स्वाभिमान' पक्षाच्या रवी राणांवर सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

BJP Assembly Election 2024 : अमरावतीच्या राजकारणात आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य सातत्याने या ना त्या कारणांनी चर्चेत असते. भाजपसह महायुतीनं संपूर्ण ताकद लावूनही लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर नवनीत राणा काहीशा बॅकफूटला गेल्या आहेत.
Ravi Rana - Devendra Fadnavis - Navneet Rana.jpg
Ravi Rana - Devendra Fadnavis - Navneet Rana.jpgSarkarnama
Published on
Updated on

Amravati News : लोकसभा निवडणुकीनंतर काहीसं बॅकफूटला गेलेल्या भाजपला आता हरियाणातील दमदार विजयानंतर मोठा बूस्टर मिळाला आहे. नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधी हा विजय मिळाल्याने भाजपसह महायुतीचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे.

त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र भाजपचा प्रमुख चेहरा असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी हरियाणानंतर महाराष्ट्रात विजयी सलामी देणार असल्याचं विधान केलं होतं. आता कॉन्फिडन्स वाढलेल्या भाजपनं (BJP) विदर्भात धक्कादायक निर्णय घेतला आहे. या निर्णयाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

अमरावतीच्या राजकारणात आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि माजी खासदार नवनीत राणा हे दाम्पत्य सातत्याने या ना त्या कारणांनी चर्चेत असते.भाजपसह महायुतीनं संपूर्ण ताकद लावूनही लोकसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर नवनीत राणा काहीशा बॅकफूटला गेल्या आहेत.

त्यातच त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्यासह महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर टीकेची तोफ डागली होती.पण आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Ravi Rana - Devendra Fadnavis - Navneet Rana.jpg
Haryana Assembly Result 2024: टायमिंग चुकले! भाजपची साथ सोडलेल्या तीन नेत्यांचे राजकीय भवितव्य अंधारात?

अमरावतीच्या बडनेरा मतदारसंघासाठी भाजपच्या समन्वयकपदी 'युवा स्वाभिमान' पक्षाचे अध्यक्ष आणि अपक्ष आमदार रवी राणा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.आमदार राणा यांना भाजपकडून थेट एका मतदारसंघाच्या समन्वयकपदासारखी मोठी जबाबदारी दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा झडू लागल्या आहेत.

रवी राणा यांच्या 'युवा स्वाभिमान' पक्षाला निवडणूक आयोगाने 'पाना' हे निवडणूक चिन्ह बहाल केलं आहे. ते आगामी विधानसभा निवडणूक 'पाना' या चिन्हावर लढवणार असल्याचं स्पष्ट आहे. अशातच आता राणा यांची भाजपनं थेट वडनेरा मतदारसंघाच्या समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आल्यानं अमरावती जिल्ह्यातही नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

Ravi Rana - Devendra Fadnavis - Navneet Rana.jpg
Ram Shinde Vs Rohit Pawar : राम शिंदेंचा प्रत्येक शाब्दिक वार आमदार पवारांच्या जिव्हारी लागेल असाच; नेमकं काय भाषण केलं?

रवी राणा हे अमरावतीच्या वडनेरा मतदारसंघाचे आमदार आहेत. तर आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वांना सर्वश्रूत आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांनी देखील पाना चिन्हावरच निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या होत्या.

दरम्यान,राणा दाम्पत्याचे कट्टर विरोधक असलेल्या प्रहार पक्षाच्या बच्चू कडू यांना निवडणूक आयोगाने बॅट चिन्ह दिलं आहे. लोकसभेला कडू यांनी नवनीत राणांना पराभूत करण्यासाठी डावपेच आखले होते. तसंच ते आता रवी राणांच्या विरोधात रणनीती आखण्याच्या तयारी आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com