MLA Shweta Mahale BodyGuard Suicide : बुलढाण्यातून खळबळजनक बातमी! भाजप आमदार श्वेता महालेंच्या बॉडीगार्डची आत्महत्या

Buldhana Crime News : अजय गिरी हे गेल्या काही दिवसांपासून भाजप आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते.त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली.
Ajay Giri.jpg
Ajay Giri.jpgSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : चिखली विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार श्वेता महाले यांच्या बॉडीगार्डने बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना बुधवारी (ता.31)सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घडली.

अजय शंकर गिरी असे आत्महत्या केलेल्या बॉडीगार्डचे नाव आहे. ते बुलढाणा जिल्हा पोलिस दलात कार्यरत होते. गिरी हे सध्या बुलढाणा येथील पोलिस वसाहतीमध्ये राहत होते. गिरी हे आपल्या कुटुंबासह तिथे राहत होते. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही . पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहे.

अजय गिरी हे गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आमदार श्वेता महाले यांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते.त्यांनी रिव्हॉल्व्हरमधून स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. गिरी यांनी कौटुंबिक कारणातून स्वत:चं आयुष्य संपवल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

एका राजकीय महिला नेत्याच्या बॉडीगार्डने अशाप्रकारे जीवन संपवल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वीच अजय गिरी हे भाजप आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांच्या अंगरक्षकाच्या ड्युटीवर नियुक्त करण्यात आले होते.त्यांच्या या टोकाच्या निर्णयामुळे बुलढाणा पोलीस कॉलनीत शोककळा पसरली आहे.

Ajay Giri.jpg
Prakash Ambedkar : 'महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचे सुचवलं जातंय', प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली भीती

भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात चिखलीतील जिल्हा परिषदेपासून केली होती. त्यांनी चिखलीतील उंद्री सर्कलचे प्रतिनिधित्व केले आहे. जिल्हा परिषदेत महिला बालकल्याण सभापती म्हणूनही काम केल्यानंतर त्या थेट विधानसभेच्या निवडणुकीत उतरल्या आणि पहिल्याच प्रयत्नात विजयी झाल्या. शिवाय आक्रमक आणि अभ्यासू स्वभावामुळे त्या अल्पावधीतच लोकप्रिय आमदार ठरल्या आहेत.

Ajay Giri.jpg
Amit Shah on Wayanad Landslide : 'सात दिवसांपूर्वीच दिला होता इशारा, केरळ सरकारने..' ; अमित शहांचं मोठं विधान!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com