MLC Nilay Naik : ‘या’ निमित्ताने पुसदकरांनी पहिल्यांदा आमदार नाइकांना थिरकताना पाहिले !

Youth Of Pusad : तरुणांनी त्यांचा ठेका पाहून थिरकत अधिकच जल्लोष केल्याचे चित्र होते.
MLC Nilay Naik and Others.
MLC Nilay Naik and Others.Sarkarnama
Published on
Updated on

पुसदचे विधान परिषदेचे सदस्य आमदार अ‍ॅड. निलय नाईक हे तसे धीरगंभीर लोकप्रतिनिधी. आजतागायत त्यांना कुठल्याही कार्यक्रमात ठेका धरताना नागरिकांनी पाहिले नव्हते. मात्र रामलल्ला प्रतिष्ठापनेनिमित्त भारतीय जनता पार्टी पुसद तालुक्याच्यावतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीत प्रथमच आमदार अ‍ॅड. निलय नाइकांना जनतेने एका गीतावर थिरकताना पाहिले.

अ‍ॅड. निलय नाइकांना थिरकताना पाहून जनतेतही उत्साह संचारल्याचे चित्र होते. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि दिवंगत मुख्यमंत्री तथा राज्यपाल सुधाकरराव नाईक यांचे वारस असलेले अ‍ॅड. निलय नाईक हे भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद सदस्य आहेत. यापूर्वी त्यांनी राजकीय क्षेत्रात अनेक पदे भूषविली आहेत. मात्र अ‍ॅड. निलय नाईक यांची प्रतिमाही धीरगंभीर आणि संयमी राजकारणी अशी आहे.

MLC Nilay Naik and Others.
Yavatmal Mahayuti : भावना गवळींचा पत्ता कापण्याचा इंद्रनिल नाईकांचा असाही प्रयत्न

यापूर्वी त्यांना कधीही कुठल्याही समारंभात थिरकताना अथवा उत्साहात पाहिल्या गेल्या नव्हते. मात्र 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना होती. हा उत्सव संपूर्ण देशानेच अगदी दिवाळीप्रमाणे साजरा केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा उत्सव प्रत्येक नागरिकाने आणि कुटुंबाने आनंदाने साजरा करावा, असे आवाहन केले होते. त्याचाच एक भाग म्हणून पुसद येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत आमदार अ‍ॅड. निलय नाईक हे देखील सहभागी झाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी ‘भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा’ हे गीत मिरवणुकीत सामील काहींनी म्हटले. यावेळी त्यांच्या आवाजात आणि सुरात सुर मिसळीत अ‍ॅड. निलय नाईक यांनीही म्हटले. नव्हेतर त्यांनी या गीतावर ठेका धरत अनेकांना सुखद धक्का दिला. एरव्ही धीरगंभीर राहणाऱ्या आमदार निलय नाईकांनी प्रथमच ठेका धरल्याने अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. नव्हेतर तरुणांनी त्यांचा ठेका पाहून थिरकत अधिकच जल्लोष केल्याचे चित्र होते.

221 किलोंच्या लाडूचा महाप्रसाद..

अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या प्रतिष्ठापनेनिमित्त देशातील शहरी आणि ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणीच विविध आयाम राबविले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचा तो एक भाग होता. त्याचाच एक भाग म्हणून पुसद येथे भारतीय जनता पार्टीच्यावतीने आणि आमदार अ‍ॅड. निलय नाईक यांच्यावतीने 221 किलोंचा लाडू तयार करण्यात आला होता. हा लाडू प्रभू श्रीरामांना अर्पण करीत त्याच्या प्रसादाचे नागरिकांना अ‍ॅड. निलय नाईक यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com