Loksabha Election : बुलढाण्यात मनसे देणार प्रस्थापित नेत्यांना टक्कर

Raj Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी घेतला मतदार संघाचा आढावा
Maharashtra Navnirman Sena in Buldhana.
Maharashtra Navnirman Sena in Buldhana.Sarkarnama

Buldhana District News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय. लोकसभा निवडणुकीचे वेध आता सर्वच पक्षांना लागलेय. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील लोकसभा निवडणुकीवर ‘फोकस’ केलाय. मनसे बुलढाणा लोकसभेची निवडणूक लढविणार आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे या मतदारसंघातील नेते, कार्यकर्त्यांना निवडणुकीसाठी ‘ग्रीन सिग्लन’ मिळालाय. (MNS Chief Raj Thackeray Told Party Workers To Get Prepered For Loksabha Election 2024 At Buldhana)

Maharashtra Navnirman Sena in Buldhana.
Buldhana News : रविकांत तुपकरांचा सरकारला अल्टिमेटम, अन्यथा मंत्रालयाचा ताबा घेणार

शेगाव येथे मनसेची आढावा बैठक घेण्यात आली. त्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढण्याचा निर्धार करण्यात आला. हा मतदार संघ मनसेसाठी अनुकूल मानला जात आहे. लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत ‘शिवतीर्था’वरील बैठकीत निश्चित करण्यात आल्याचं विठ्ठल लोखंडकर यांनी ‘सरकारनामा’शी बोलताना सांगितलं. निवडणुकीसाठी तयारी करण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी दिल्याचं ते म्हणाले.

आता कार्यकर्त्यांना त्यांच्या ‘राज साहेबांचा’ आदेश मिळाल्यानं ते जोमानं कामाला लागले आहेत. अद्याप मनसेचा उमेदवार ठरलेला नसला, तरी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडे आहे. गेल्या २५ वर्षांपासून शिवसेनेचा भगवा या मतदार संघावर फडकत आहे. आता हा मतदारसंघ शिवसेनेकडून कसा ताब्यात घेता येईल, यासाठी मनसे तगड्या उमेदवाराचा शोध घेत आहे. उमेदवारांच्या नावांची चाचपणी सध्या करण्यात येत आहे. मात्र काहींनी उमेदवारही निश्चित झाल्याचं सांगितलय.

शेगांव येथील बैठकीत बुलढाण्यात मनसेसाठी आणखी अनुकूल वातावरण तयार करण्याची सूचना कार्यकर्त्यांना करण्यात आली. सर्वांनी पक्षाला वेळ देत संघटन मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आदेश देण्यात बैठकीला मनसे नेते माजी आमदार अॅड.जयप्रकाश बावीस्कर, संपर्क अध्यक्ष विठ्ठल लोखंडकार यांच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यातील जवळपास २२ लोकसभा मतदारसंघात मनसे आपले भाग्य आजमावणार आहे. २२ पैकी बुलढाणा लोकसभा मतदारसंघ एक आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत बुलढाण्यात मनसे महत्वाचा फॅक्टर ठरण्याची शक्यता आहे. पश्चिम विदर्भातील आणखी कोणत्या मतदार संघात मनसे निवडणूक लढविणार आहे, याबद्दलची उत्सुकता नेते व पदाधिकाऱ्यांना लागली आहे. मात्र तूर्तास मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केवळ बुलढाणा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीची वेळ जवळ आल्यानंतर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यांबाबत चित्र स्पष्ट होण्याचे संकेत आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Maharashtra Navnirman Sena in Buldhana.
Buldhana News : मनोज जरांगे पाटील यांचा पुतळा जाळला, गुन्हा दाखल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com