Marathi Issue : कोर्टाच्या आदेशांबाबत प्रशासकीय यंत्रणा सुस्त; मनसेही बॅकफूटवर

Maharashtra Navnirman Sena : दुकानांवर इंग्रजी पाट्या कायम, अद्याप एकही कारवाई नाही.
Marathi Board Issue
Marathi Board IssueSarkarnama
Published on
Updated on

Akola Politics : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांनंतरही शहरातील अनेक दुकानांवर अद्यापही इंग्रजी भाषेतील पाट्या कायम आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सर्वोच्च न्यायालयाचे आदेश किती गंभीरतेने घेते याबद्दल प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठी पाट्या लावण्यासाठी 25 नोव्हेंबरपर्यंत मुदत दिली होती. अकोला महापालिका प्रशासनही याबाबत उदासीन असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका प्रशासनाला निवेदन देऊन आक्रमक आंदोलनाचा इशारा देणारी मनसे का शांत आहे? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कोर्ट-कचेरीत पैसा खर्च करण्यापेक्षा मराठी पाट्यांसाठी पैसे खर्च करा, अशी कानउघाडणी करीत सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह राज्यातील व्यापारी संघटनेला 25 नोव्हेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. ही ‘डेडलाईन’ संपून दीड महिना लोटला आहे. अकोला महापालिका क्षेत्रात अद्यापही इंग्रजी पाट्या अनेक दुकानांवर कायम आहेत. याकडे लक्ष द्यायला महापालिका प्रशासनाला वेळ नसल्याचे दिसत आहे.

Marathi Board Issue
Akola : बंजारा समाजाचे आंदोलन अन् राधाकृष्ण विखे-पाटलांचा गनिमी कावा...

महापालिकेच्या उदासीन धोरणामुळे डेडलाईन संपल्यावरही कारवाई होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे. सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन संपण्याच्या आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला निवेदन देत व्यापाऱ्यांना मराठी पाट्या दुकानांवर लावण्याचे सूचित करावे, असा इशारा दिला होता. ही मुदत केव्हाच संपली आहे.

मुदत संपल्यानंतरही अकोल्यात मनसे का गप्प आहे, अशी चर्चा सुरू आहे. डेडलाईन आणि मनसेचा इशारा हवेत विरला का? असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. पाट्यांचा मुद्दा सर्वोच न्यायालयापर्यंत गेला होता. मात्र अनेक ठिकाणी अद्यापही मराठी भाषेतील पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हा मुद्दा लावून धरला जाईल, अशी अपेक्षा होती. परंतु मनसेही याबाबत उदासीन दिसत आहे. मनसे का ‘बॅकफूट’वर आली, अशी विचारणा आता होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

निवडणूक जवळ आल्याने कदाचित हा परिणाम असावा, असे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणूक पाहता अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या मुद्द्यांवरून आंदोलन करताना दिसत आहेत. मात्र सुरुवातीपासून मराठीचा लावून धरलेल्या मनसेला मराठीच्या ‘म’चा विसर पडला आहे. विशेष म्हणजे अगदी दोनच दिवसांपूर्वी मनसेने महापालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. मनपाचे संकेतस्थळ आणि ट्विटर हॅन्डल सुरू करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. परंतु मराठी पाट्यांबाबत कोणीही चकारशब्दही काढला नाही.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Marathi Board Issue
Akola Shiv Sena : मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही, कोण म्हणालं असं...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com