Akola : बंजारा समाजाचे आंदोलन अन् राधाकृष्ण विखे-पाटलांचा गनिमी कावा...

Radhakrishna Vikhe Patil News : बोगस जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर रास्ता रोको...
Banjara Protest in Akola
Banjara Protest in AkolaSarkarnama
Published on
Updated on

Banjara Protest : बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थी व देणाऱ्या जात पडताळणी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या प्रमुख मागणीसाठी बुधवारी (ता. 17) बंजारा समाजाने आंदोलन केले आहे. महसूलमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा ताफा अडविण्यासाठी बंजारा समाज अकोल्यातील नेहरू पार्क चौकात जमला होता.

आंदोलनाची माहिती मिळाल्याने ज्या मार्गावरून पालकमंत्री जाणार होते तो मार्गच त्यांच्या ताफ्याने बदलला. दुसऱ्याच मार्गाने विखे-पाटलांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्यांचा हा ‘गनिमी कावा’ यशस्वी ठरल्याची चर्चा होती.

Banjara Protest in Akola
Akola Shiv Sena : मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही, कोण म्हणालं असं...

बोगस जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थी व देणाऱ्या जात पडताळणी अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी गोरसेना व बंजारा समाजातील इतरही संघटनेनी वारंवार सरकारकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी पोहरादेवी येथे बंजारा समाजाच्या 25 मागण्या मान्य करण्याचे आश्वासन शिंदे सरकारनी दिले होते. परंतु अद्याप एकही मागणी मान्य झालेली नाही. उलट बोगस जात वैधता प्रमाणपत्र देणाऱ्या जात पडताळणी अधिकाऱ्यांना शिंदे सरकार पाठीशी घालत असल्याचा आरोप होत आहे.

सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने आक्रमक भूमिका घेत बंजारा समाजाने रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. राज्याचे महसूलमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे बुधवारी अकोला दौऱ्यावर होते.

शिवणी विमानतळ येथे दुपारी बारा वाजण्याच्यादरम्यान ते दाखल झाले. त्यांनतर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यासाठी ते जाणार होते. शिवणी विमानतळ, नेहरू पार्क चौक, अशोक वाटिका चौक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय असा त्यांच्या ताफ्याचा मार्ग होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बंजारा समाजातील आंदोलनकर्ते पालकमंत्री विखे-पाटील यांचा ताफा अडविण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नेहरू पार्क चौकात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता.

काही आंदोलक हे नेहरू पार्क चौकात, तर काही आंदोलक हे अशोक वाटिका चौकात होते. अशात पालकमंत्री विखे-पाटील यांचा ताफा शिवणीवरून दुसऱ्याच मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्यामुळे आंदोलकांची दिशाभूल करून ताफा पोलिसांनी अन्यत्र वळविला.

विखे-पाटील यांच्या या गनिमी काव्याचीच चर्चा यावेळी सुरू होती. दुसरीकडे आंदोलकांनी आपले आंदोलन कायम ठेवत नेहरू पार्क चौकात रास्ता रोको आंदोलन केले. सरकारच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

या आंदोलनात शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते. विमुक्त जाती (अ) प्रवर्गात अवैध मार्गाने खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या व वितरित करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर व लाभार्थ्यांवर कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली.

Banjara Protest in Akola
Akola : दंगल, आरोप आणि मोर्चानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये

विशेष तपासणी पथक (SIT) नेमत या प्रकरणाचा छडा लावण्यात यावा, महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात वैधता पडताळणी समितीमध्ये विमुक्त जाती (अ) प्रवर्गातील एक शासकीय प्रतिनिधी नेमण्यात यावा, 2017 मधील रक्त नातेसंबंधीचा शासननिर्णय रद्द करण्यात यावा, संपूर्ण महाराष्ट्रात मूळ राजपूत भामटा व विमुक्त-भटक्या जमाती प्रवर्गातील सर्व जातींचे लोक प्रत्यक्षात कुठे निवासी राहतात त्या तालुका व जिल्हानिहाय यादी बार्टीकडून जाहीर करण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

Edited By : Prasannaa Jakate

R...

Banjara Protest in Akola
Akola : महिलेला बलात्काराची धमकी देणारा आरोपी कोणत्या आमदाराचा पंटर?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com