MNS News : 'मराठी पाट्यां'च्या यशानंतर आता मराठी गाण्यांसाठी मनसे आक्रमक !

Raj Thackeray News : तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
MNS News
MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola News : अकोला शहरातील एका नामांकित रेस्टॉरंटमध्ये इंग्रजी गाणी लावण्यात येत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्रजी गाण्यांऐवजी मराठी गाणी लावावा, असा दम मनसेने रेस्टॉरेंट संचालकाला दिला आहे. अन्यथा 'खळ्ळ खट्याक' पद्धतीने तीव्र आंदोलनाचा इशारा मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

मराठीच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमीच आक्रमक असल्याचे आजवर पाहायला मिळाले आहे. अनेकदा मनसेने मराठीचा मुद्दा पुढे करत आंदोलन केली आहेत. आता याच मुद्द्यावरून अकोल्यातदेखील मनसेने एका खासगी रेस्टॉरंटच्या व्यवस्थापनाला 'दम' दिला आहे. अकोला शहरातील गोरक्षण मार्गावरील काही रेस्टॉरंटमध्ये मराठी गाणे न लावता इंग्रजी गाणे वाजविले जातात.

MNS News
ED Action On Sanjay Singh : मोठी बातमी ! दिल्लीतील मद्य घोटाळ्यात खासदार संजय सिंहांना ईडीकडून अटक

इंग्रजी गाणी लावली जातात, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी थेट रेस्टॉरंट गाठून व्यवस्थापनाला जाब विचारला. यावर हे इंग्रजी गाणे वैयक्तिक नभोवाणीवरून वाजवले जात असल्याचे उत्तर येथील स्थानिक कर्मचाऱ्यांनी दिले. त्यावर मनसे पदाधिकाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी व्यवस्थापकाशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यावर वरिष्ठ व्यवस्थापनाने काही दिवसांचा वेळ मागितला व त्यांना 'ई मेल'द्वारे कळवण्यात आले.

मराठी गाणे वाजणार नाही तोपर्यंत सुरू असलेले इतर गाणे बंद करावे, अशी आग्रही भूमिकाही मनसेने घेतली. त्यानंतर दोन दिवसांपासून संबंधित रेस्टॉरंटमध्ये गाणे बंद आहे. लवकरात लवकर मराठी गाणी वाजवण्यात यावीत, अन्यथा मनसे आक्रमक आंदोलन करणार असल्याचा इशारा व्यवस्थापकाला देण्यात आला. या वेळी जिल्हाध्यक्ष पंकज साबळे, शहर संघटक अरविंद शुक्ला, जिल्हा सहसचिव मोहन मते, शहर उपाध्यक्ष सोनू अवचार व आकाश शेजे उपस्थित होते.

प्रतिष्ठानांनी मराठी पाट्या लावाव्यात, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठपुरावा केला. त्याला यश मिळाले आणि न्यायालयाने तसा आदेश देत मराठी पाट्या लावण्याचे बंधनकारक केले. यासाठी न्यायालयाने दोन महिन्यांचा वेळ दिला. या कालावधीत शांत राहण्याचे आदेश मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. मुदतीनंतरही काही दुकानदारांना मराठी पाट्या न लावल्यास मनसैनिक पुन्हा 'खळ्ळ खट्याक' करणार आहेत. त्यापूर्वी मराठी गाण्यांचा विषय निकाली निघावा, नाहीतर आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

MNS News
ED Action On Sanjay Singh : 'मरना मंजूर है, झुकना मंजूर नहीं...'; ईडीकडून अटक झाल्यानंतर संजय सिंहांची प्रतिक्रिया

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com