MNS News : उमेदवारी अर्ज बाद अन् खळखट्याक! मनसैनिकांनीच फोडलं 'मनसे'चं ऑफिस

Akola West Assembly Constituency News : उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. तर मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिकांची मोठी निराशा झाली आहे.
Akola MNS News
Akola MNS NewsSarkarnama
Published on
Updated on

Akola News, 01 Nov : अकोला (Akola) जिल्ह्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनीच मनसेच्या उमेदवाराचं ऑफिस फोडल्याची घटना समोर आली आहे.

मनसेच्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार प्रशंसा अंबेरे (Prashansa Ambere) यांनी विरोधकांशी हातमिळवणी करत उमेदवारी अर्जात महत्वाची माहिती लपवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे.

याच रागातून अकोल्यातील डाबकी रोड भागातल्या आठवडी बाजार चौकातील अंबेरे यांचं कार्यालय मनसैनिकांनी फोडलं आहे. मनसेचे (MNS) शहर उपाध्यक्ष अविनाश मुरेकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयात घुसून ही तोडफोड केल्याची माहिती आहे.

Akola MNS News
Karuna Sharma: करुणा शर्मा मुंडे ढसाढसा रडल्या! म्हणाल्या, 'तो राक्षस आहे. मी 26 वर्ष त्याला स्वत:चं रक्त पाजलं...' VIDEO पाहा

शिवाय उमेदवारी अर्ज फेटाळण्याच्या प्रकारात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोपही मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिस अधिकचा तपास करत आहेत. तर मनसेचा उमेदवार अपात्र ठरल्याने मनसैनिकांची मोठी निराशा झाली आहे. त्यामुळे स्थानिक मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

Akola MNS News
Navi Mumbai Accident : ऐन दिवाळीत 'ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्ह'चा थरार, कार चालकाने तिघांना उडवलं, VIDEO व्हायरल

नेमकं प्रकरण काय?

विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. शिवाय अर्जाची छाननी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज छाननी करण्यात आली. त्यामध्ये अकोला (Akola) जिल्ह्यातील मनसेच्या उमेदवार प्रशंसा अंबेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला.

प्रशंसा अंबेरे यांचे वय 25 दिवसांनी कमी असल्यामुळे त्यांचा अर्ज फेटाळला. मात्र, अंबेरे यांनी मुद्दाम ही माहिती लपवल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्याच रागातून त्यांनी अंबेरे यांचं कार्यालय फोडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com