Modi : मोदी म्हणाले, आज संकष्टी चतुर्थी आहे, टेकडीच्या गणेश बाप्पांना माझे वंदन…

Maharashtra : महाराष्ट्राच्या विकासासाठी महान नक्षत्रांतील ११ ताऱ्यांचा उगम होत आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Inauguration of Samriddhi Highway : आज संकष्टी चतुर्थी आहे. कोणतेही शुभ काम करताना आपण प्रथम गणेश पूजन करतो. आज नागपुरात आहो, तर टेकडीच्या गणपती बाप्पांना माझे वंदन, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. मराठीतून सुरुवात केल्याने उत्साहात असलेल्या लोकांचा उत्साहात अधिक भर पडली. समृद्धी महामार्गासह विविध ११ कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज मोदींनी केले.

आज पवित्र दिवस आहे. महाराष्ट्राच्या (Maharashtra) विकासासाठी महान नक्षत्रांतील ११ ताऱ्यांचा उगम होत आहे. पहिला समृद्धी महामार्गे, दुसरा एम्स, तिसरा नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, चौथा आयसीएमआरचे रिसर्च सेंटर, पाचवा पेट्रोल केमिकल चंद्रपूरची (Chandrapur) स्थापना, सहावा नाग नदीचे पुनरुज्जीवन, सातवा मेट्रो फेज १ चे लोकार्पण आणि दुसऱ्या फेजचा शिलान्यास, आठवा नागपूर विलासपूर वंदे भारत एक्सप्रेस, नववा नागपूर (Nagpur) अजनी पुनर्विकासाची योजना, दहावा अजनीत १२ हजार हॉर्सपावर इंजीन डेपोचे लोकार्पण आणि अकरावा नागपूर इटारसी नरखेड मार्गाचे लोकार्पण आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadanvis) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भारती पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) होते.

मोदी म्हणाले, ११ ताऱ्यांचे नक्षत्र महाराष्ट्राच्या विकासला नवी दिशा देईल. ७५ वर्षाव्या अमृत महोत्सवात ७५ हजार कोटी रुपयांच्या कामांसाठी राज्यातील जनतेचे अभिनंदन. डबल इंजीन सरकार गतीने काम करीत आहे, याचे उदाहरण म्हणजे आजचे आयोजन आहे. नागपूर ते मुंबईचे अंतर कमी होणार आहेच, पण २४ जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टीवीटीने जोडणारा हा महामार्ग आहे. शेती, देवदर्शन, उद्योग, पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे. सर्व ११ प्रोजेक्ट म्हणजे एका पुष्पगुच्छातील वेगवेगळी फुले आहे. हा विकासाचा गुलदस्ता आहे. विशाल बगिच्याचे प्रतिबिंब आहे. देशात पहिल्यांदा असे सरकार आहे. की इन्फ्रास्ट्रक्चरला मानवी स्वरूप दिले आहे.

Narendra Modi
PM Narendra Modi: देशातील तरुणांना जातीपाती आणि परिवाराचं राजकारण नकोय : नरेंद्र मोदी

प्रत्येक गरिबाला ५ लाख रुपयांपर्यंत उपचार मोफत देणारी आयुष्यमान भारत योजना आहे. ४५ कोटी पेक्षा जास्त गरिबांना जोडणारी जनधन योजना आर्थिक इन्फ्रास्ट्रक्चरचे उदाहरण आहे. या सर्वात एक गोष्ट कॉमन आहे संवेदनशीलता. विस्तार फार मोठा आहे. गोसेखुर्द प्रकल्पाची सुरुवात झाली तेव्हा तो ४०० कोटी रुपयांचा होता. पण वेळेत कामे न केल्याने अनुमानित खर्च १८ हजार कोटी रुपयांपर्यंत गेला. महाराष्ट्रात डबल इंजीन सरकार बनल्यानंतर कामाची गती वाढली, अडचणी सोडविल्या. यावर्षी हा डॅम पूर्ण भरला. ३ दशकांपेक्षा जास्त कालावधी लागला. तेव्हा कुठे शेतकऱ्यांना लाभ मिळू लागला आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com