Monsoon Session 2023 : आमदार प्रवीण दटकेंनी वाढवल्या कुलगुरू सुभाष चौधरींच्या अडचणी !

Nagpur : कुलगुरूंनी त्याच कंपनीला काम दिल्याचे आढळले आहे.
Pravin Datke
Pravin DatkeSarkarnama

Monsoon Session of Maharashtra Assembly 2023 News : वादग्रस्त एमकेसील कंपनीला परीक्षेसंदर्भात काम देऊ नये, असे आदेश असतानाही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या कुलगुरूंनी त्याच कंपनीला काम दिल्याचे आढळले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत केली. (Subhash Chaudhary's problems have increased)

कुलगुरू सुभाष चौधरी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. एमकेसीएल कंपनीच्या अनियमिततेची चौकशी सुरू असताना त्यांना निकालासंदर्भात कुठलेही काम देऊ नये, असे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांनी दिले होते. त्यानंतरही कुलगुरुंनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच कंपनीला काम दिले.

याकडे विधान परिषदेचे सदस्य तसेच भाजपचे शहर अध्यक्ष आमदार प्रवीण दटके यांनी प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले. या प्रश्नावर उत्तर देताना उच्चशिक्षण मंत्री पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश आणि एमकेसीएल कंपनीला ताबडतोब निलंबनाचे आदेश देण्यात आले होते, असे सांगितले. त्यानंतरही कुलगुरू या कंपनीबाबत अत्यंत आग्रही असल्याचे दिसले.

कुलगुरूंवर कारवाई करावी याकरिता राज्यपालांकडे संपूर्ण माहिती सादर करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात लवकरच चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश दिल्याची माहीती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.

Pravin Datke
MLC Pravin Datke म्हणाले, इतक्या झपाट्याने बदललेले दुसरे शहर देशात नाही...

नागपूर विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल उशिरा लावणे तसेच अन्य अनियमित कामाकाजाबाबत चौकशी करण्यासाठी शासनस्तरावरून चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालातील शिफारशी विचारात घेऊन कुलगुरूंना संबंधितावर कारवाई करण्याचे तसेच सदर प्रकरणाचा खुलासा सादर करण्यास कळवण्यात आले होते. कुलगुरूंच्या खुलाशावर आवश्यक कारवाई करण्यासाठी राज्यपालांकडे (Governor) प्रकरण सादर केले होते, असेही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले.

कुलगुरूंचा राजीनामा घ्यावा..

नागपूर (Nagpur) विद्यापीठाची ऑनलाईन अधिसभा, त्यात ठेवण्यात आलेला विषय, हा दिशाभूल करणार आहे. कुलपती यांच्या कार्यालयातून परवानगीसुद्धा दिशाभूल करून मिळवण्यात आली आहे. त्यामुळे ही सभा रद्द करण्यात यावी आणि कुलगुरू चौधरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी केली आहे. त्यांनी (Chief Minister) मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना तसे निवेदनही दिले आहे.

Pravin Datke
Nagpur Municipal Corporation : अजित पवार सत्तेत आल्यामुळे अस्थिरता वाढली, महापालिका निवडणुका लांबणार?

अधिसभेत उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांच्या व परिसंस्थानच्या ठिकाणांसाठी सर्वसमावेशक बृहत आराखड्यास मान्यता देणे हा विषय ठेवण्यात आला आहे. त्यासाठी ऑनलाईन बैठकीची परवानगी मागण्यात आली आहे. मात्र कुलगुरुंनी आपल्या अधिकाराचा वापर करून बृहत आराखडा अधिसभेच्यावतीने आधीच पारित केला आहे.

आता ऑनलाईन बैठक बोलावण्याचे औचित्य काय, अशी विचारणा बाजपेयी यांनी केली आहे. कुलगुरू आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत नसल्याने त्यांना राजीनामा घ्यावा, अशी मागणीही ॲड. बाजपेयी यांनी केली आहे.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com