Mouda APMC Election Result : काँग्रेसच्या एकीमुळे मौदा बाजार समितीवरही कब्जा, केदारांची जादू चालली !

BJP : भाजपला फक्त एक आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले.
Mouda APMC
Mouda APMCSarkarnama

Nagpur District's Mouda APMC Election Result News : मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडीसाठी काल (ता. ३०) मतदान झाले त्यानंतर मतमोजणी पार पडली. मौदा कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत १८ जागांसाठी एकूण ३५ उमेदवार रिंगणात होते. १८ पैकी १६ जागांवर काँग्रेसने कब्जा केला. (Congress captured 16 out of 18 seats.)

भाजपला फक्त एक आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागले. यात काँग्रेसच्या एकीमुळे बाजार समितीत भाजपचा सुपडा साफ झाला. मौदा बाजार समितीची निवडणूक रंगतदार झाली. ही निवडणूक काँग्रेसकडून केदार यांच्या नेतृत्वात लढवण्यात आली होती. या निवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी व शिंदे गट हे तिन्ही पक्ष एकत्र झाल्याने ही निवडणूक चुरशीची होणार, असे वाटले होते. पण कॉंग्रेसने येथे सहज विजय मिळवला.

काँग्रेससोबत महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे गटातील नेते व कार्यकर्ते यांनी हातमिळवणी केली. यात केदार गटाचे जास्त वर्चस्व असल्याचे दिसून येत होते. कोणत्या पक्षाच्या जागा कुणाला किती मिळतील, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. निवडणुकीचा निकाल आज काँग्रेसच्या बाजूने लागला. मौदा बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिंदे गट, ठाकरे गट यांच्यासाठी अस्तित्व सिद्ध करण्याची लढाई असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

सहकार क्षेत्रावर आपले वर्चस्व आहे, हे माजी मंत्री, आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दाखवून दिले. त्यांचा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या सावनेरमध्ये भाजपने लढायचीही हिंमत केली नाही. सावनेर बाजार समिती अविरोध झाली. त्यानंतर रामटेकमध्येही सुनील केदारांचे जुने कार्यकर्ते सचिन किरपान यांनी मोठा विजय मिळवला. त्यांनी स्वतंत्र पॅनल टाकून निवडणूक लढवली असली तरी ते सुनील केदार यांच्यासोबतच जातील, अशी चर्चा आहे. त्यामुळे रामटेकवरही केदारांचेच वर्चस्व आहे, असे समजायला काही हरकत नाही.

Mouda APMC
Amravati APMC Election News : राणांना नाही जमली सहकाराची गोळाबेरीज, यशोमतींनी उडवला धुव्वा !

सेवा सहकारी मतदार संघातून सर्वसाधारण गटातून रामनरेश सेनवार, दादाराव सार्वे, नंदलाल पाटील, ज्ञानेश्वर वानखेडे, चंद्रभान किरपान, अनिल कोंगे, दिगांबर बांगडकर, महिला गटातून कल्पना चरडे, मंदा तुमसरे, भटक्या विमुक्त गटातून सुनील दारोडे, ग्रामपंचायत मतदार संघातून सर्वसाधारण प्रमोद बरबटे, मंगेश तलमले, अनुसूचित जाती गटातून रोशन मेश्राम आर्थिक दुर्बल गटातून पृथ्वीराज गुजर (भाजप, (BJP) शिवसेना (Shivsena) राष्ट्रवादी (NCP)) आडते व व्यापारी मतदार संघातून राजेंद्र लांडे व सावन कुमार येळणे हमाल व मापारी मतदारसंघातून मोरेश्वर सोरते (भाजप, शिवसेना राकाँपा) हे उमेदवार विजय झाले आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com