New Parliament Building News : नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावर राहुल गांधींची एका वाक्यात प्रतिक्रिया

Rahul Gandhi news : नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज (ता. 28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Parliament Building : नव्या संसद भवनाचे उद्घाटन आज (ता. 28) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. नव्या संसद भवनाचे उद्घाटन होताच बहिष्कार नोंदवलेल्या विरोधकांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

राहुल गांधी यांनी या संदर्भात ट्विट करत अवघ्या दोन ओळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर निशाणा साधला आहे. नव्या संसद भवनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांना आमंत्रण देण्यात आले नाही, असा दावा विरोधी पक्षांनी केला होता.

Rahul Gandhi, Narendra Modi
NCP Vs Congress : अजितदादा, खडा टाकू नका : पुण्याच्या जागेवरून काँग्रेस नेत्याने सुनावले

संसद भवनाच्या उद्घाटनावर २० विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला. संसद हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे, असे सांगत विरोधकांनी निवेदन जारी केले होते. राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यातील उद्घाटन होताच ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi, Narendra Modi
New Parliament Building : नव्या संसदेवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले, "सर्वांना विचारात घ्यायला.."

''संसद लोकांचा आवाज आहे. पंतप्रधान संसद भवनाच्या उद्घाटनाला राज्याभिषेक समजत आहेत'', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांनी सुरुवातीपासूनच या उद्घाटन कार्यक्रमावर टिका केली होती. तसेच, अनेकांना आमंत्रण देण्यात आले नसल्याचा दावाही विरोधी पक्षातील खासदारांनी केला. यावरुन आता देशातील राजकारण तापले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com