Dhanorkar Vs Wadettiwar : काँग्रेसमध्ये दुफळी! धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार वाद पेटला; बालेकिल्ल्यात जाऊन थेट पाडण्याची भाषा

Vijay Wadettiwar Vs Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीला वड्डेटीवार यांनी विरोधा दर्शवला होता. ती आग अजूनही धगधगत आहे.
Pratibha Dhanorkar | Vijay Wadettiwar
Pratibha Dhanorkar | Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News: चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर आणि काँग्रेसचे नेते, विधानसभेतील विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. खासदार धानोरकर यांनी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघाने अल्पसंख्याक लोकप्रतिनिधी देण्याची परंपरा बदलली पाहिजे, असे सांगून थेट वडेट्टीवार यांच्यावर निशाणा साधला. हे बघता पुन्हा एकदा धानोरकर विरुद्ध वडेट्टीवार यांच्यात शाब्दिक 'वॉर' सुरू होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर लोकसभा मतदासंघातून धानोरकर यांच्या उमेदवारीला वडेट्टीवार (vijay Wadettiwar) यांनी विरोध दर्शवला होता. त्यांना येथून त्यांची मुलगी शिवानी वडेट्टीवार यांना उमेदवारी द्यायची होती. शिवानी वडेट्टीवार यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात देखील केली होती. अनेक माध्यमांना भेटी दिल्या होत्या. प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर सुरू केला होता.

मात्र, प्रतिभा धानोरकर यांनी आपणच लोकसभेची निवडणूक लढणार, असे आधीच जाहीर केले होते. त्यांचे पती बाळू धानोरकर चंद्रपूरचे खासदार होते. त्यांनी भाजपचे नेते हसंराज अहीर यांचा पराभव केला होता. त्यांच्या अकाली निधनानंतर प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला होता. काँग्रेसच्या (Congress) काही नेत्यांचाही त्यांच्या मागणीला पाठिंबा होता.

Pratibha Dhanorkar | Vijay Wadettiwar
Nagpur Politics : नागपूरचं वार फिरणार ? 'नो काँग्रेस, नो भाजप...ओन्ली रिपब्लिकन?'

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे त्यांच्यासाठी अनुकूल होते. त्यामुळे वडेट्टीवार यांना माघार घ्यावी लागली. प्रतिभा धानोरकर निवडून आल्यानंतर दोघांमधील वाद संपले, असे दिसत होते. मात्र, आता वडेट्टीवार यांच्या मतदारसंघात जाऊन खासदार धानोरकर यांनी केलेल्या वक्तव्यावरून वादाच्या दुसऱ्या अंकास सुरुवात झाली असल्याचे दिसून येते.

ब्रह्मपुरी शहरात कुणबी समाजाचे महाअधिवेशन रविवारी घेण्यात आले. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतच भाजचे आमदार आमदार परीणय फुके हे देखील अधिवेशनात सहभाही झाले होते. खासदार धानोरकर यांनी आपल्या भाषणात, "गेली काही वर्षे ब्रह्मपुरी आणि गडचिरोलीत आपल्यावर अल्पसंख्याक समाजाचे लोक प्रतिनिधित्व करत आहेत. ही परंपरा बदलली पाहिजे," असे मत व्यक्त केले.

Pratibha Dhanorkar | Vijay Wadettiwar
NCP Ajit Pawar : 'NCP'मध्ये भूकंपाचे संकेत? पक्ष नेतृत्वाला डावलून अजितदादांच्या 10 जिल्हाध्यक्षांची तातडीची बैठक

"कुणबी समाज काही राजकारणी लोकांच्या भूलथापांना बळी पडून मॅनेज होतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हे बदला," असे आवाहन त्यांनी वडेट्टीवार यांचे नाव न घेता केले. भाजप आमदार परिणय फुके यांनी देखील आपण भाजपच्या पक्षश्रेष्ठींना या मतदारसंघातून कुणबी चेहऱ्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी आपण करणार असल्याचे सांगून आगीत आणखी तेल ओतले. यावर आता काँग्रेस काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com