Nagpur Politics : नागपूरचं वार फिरणार ? 'नो काँग्रेस, नो भाजप...ओन्ली रिपब्लिकन?'

Nagpur vidhan sabha election Politics : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर नागपूरसाठी निळी शक्ती एकवटली. गटातटांत विखुरलेल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे दोन महिन्यांपासून एकच उमेदवार देण्यासाठी बैठक सत्र सध्या सुरू आहे.
Nagpur Vidhan sabha Election
Nagpur Vidhan sabha Election Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Politics : उत्तर नागपूर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला व खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी म्हणजेच खोरिपाचा गड होता. परंतु वीस वर्षांपासून या मतदरासंघावर भाजप आणि काँग्रेसचे राज्य राहिले. सध्या हा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. यामुळे आंबेडकरी चळवळीचा हा पराभव असल्याची भावना आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत उत्तर नागपूरसाठी निळी शक्ती एकवटली. गटातटांत विखुरलेल्या रिपब्लिकन कार्यकर्त्यांचे दोन महिन्यांपासून एकच उमेदवार देण्यासाठी बैठक सत्र सध्या सुरू आहे.

निवडणूक आली की, निळी टोपी घालणारा काँग्रेसी असो वा भाजपचा (BJP) नेता. तो आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता होऊच शकत नाही, असा पक्का समज आता आंबेडकरी चळवळीतील लोकांनी केला आहे. उपवर्गीकरणाचा विषयावरून हे स्पष्ट झाले असल्याने येत्या निवडणुकीत ‘नो काँग्रेस, 'नो भाजप’ ओन्ली रिपब्लिकन' या आशयाचा ठराव रिपाईंच्या विविध गटातील कार्यकर्त्यांनी नुकत्याच झालेल्या बैठकीत पारित केला.

Nagpur Vidhan sabha Election
MLA Sunil Kedar: मोठी बातमी! काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी रद्द

उत्तर नागपुरात (Nagpur) एकच रिपब्लिकन उमेदवार उभा करण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला. बैठकीत विविध रिपाई गटाचे डॉ. प्रदीप बोरकर, विश्वास पाटील, राज सुखदेवे, दिनेश अंडरसहारे, बाळूमामा कोसमकर, विनायक जामगडे, यशवंत तेलंग, अनिल मेश्राम, डॉ.चरणदास जनबंधू, दीपक डोंगरे, शेखर पाटील, मनोज कुमार, मनोहर गायकवाड, शरद देशभ्रतार, सुरेश बोंदाडे, विनोद पाटील, चुडामण हटवार, ईश्वर सुर्यवंशी, हंसराज मेश्राम, पुरुषोत्तम पांडागले, शेषराव गणवीर, रमेश गेडाम, मोरेश्वर दुपारे, ॲड. भीमराव गेडाम, रत्नमाला गणवीर, शरद गडपायले, राजू फुलके, शैलेश गुळदे, गौतम सातपुते, धर्मेंद्र मडामे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Nagpur Vidhan sabha Election
Congress Politics : भाजपमधील माजी आमदार स्वगृही, काँग्रेस प्रवेशाची तारीख ठरली

मतदारसंघात जनसंपर्क यात्रा काढणार

शुक्रवारी रविभवन येथे आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक झाली. दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते एकसंधपणे कामाला लागल्यास या मतदारसंघात तथाकथित भाजप आणि काँग्रेस या राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. यामुळेच संयुक्त रिपब्लिकन आघाडीच्या बैठकीत एकमताने एक दिलाने एकच उमेदवार लढवायचा आणि त्या उमेदवाराला निवडून आणायचे यावर शिक्कामोर्तब झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आघाडीचे अध्यक्ष अमृत गजभिये होते. रविवारी (ता.२९) उत्तर नागपूरात निळ्या शक्तीचा रिपब्लिकन निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे. ‘आता फक्त रिपब्लिकन्स' असा एकमुखी निर्णय घेत सभेतील सर्व कार्यकर्ते, नेत्यांनी निवडणुकीची हीच घोषणा लक्षात ठेवावी आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचाराला लागण्याचे आव्हान केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com