Sunil Mendhe News: स्वतःचे पगार थांबवा, पण शेतकऱ्यांना त्यांचे पैसे द्या; खासदार सुनील मेंढेंची अधिकाऱ्यांना तंबी

Bhandara Politics: खासदार सुनील मेंढे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले
Sunil Mendhe
Sunil MendheSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News: धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी खासदार सुनील मेंढे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी पणन विभागाच्या अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. शासकीय आधारभूत खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामातील धान चुकारे मागील काही महिन्यांपासून दिले गेले नाहीत.

शेतकऱ्यांची चूक नसताना देखील विनाकारण त्यांची अडवणूक करण्याचा प्रयत्न करू नका, असे सांगत प्रसंगी स्वतःचे पगार थांबवा, पण शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे पैसे तातडीने द्या, अशा शब्दात खासदार सुनील मेंढे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले.

भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खासदार सुनील मेंढे यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. पण याच वेळी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पैशाच्या विषयावरून खासदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Sunil Mendhe
Narayan Rane News : जरांगेंनी उपोषण मागे घेताच नारायण राणेंचं मराठा आरक्षणाविषयी मोठं विधान; म्हणाले," सरसकट कुणबी दाखला..."

धान विक्री करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही चुकारे देण्यात आले नाहीत. याबाबत वारंवार सूचना देऊनही शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला दिला जात नसल्यामुळे खासदार सुनील मेंढे यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी आणि पणन विभागाचे प्रबंध संचालक यांना आज चांगलेच धारेवर धरले.

यावेळी बैठकीतून प्रबंध संचालकांना भ्रमणध्वनीवर याबाबत जाब विचारला. शेतकऱ्यांचे पैसे अडविण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? त्यांची चूक नसताना त्यांचे पैसे थांबवू नका, प्रसंगी स्वतःचे पगार थांबवून शेतकऱ्यांना पैसे द्या, अशा शब्दात खासदारांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली.

जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयाकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांचे पैसे लवकरात लवकर कसे देता येतील, याबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहनही खासदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले. दरम्यान, खासदारांनी फोनद्वारे अधिकाऱ्यांची केलेल्या कानउघडणीनंतर आता तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळणार का, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

Edited by Ganesh Thombare

Sunil Mendhe
Shasan Aplya Dari: 'शासन आपल्या दारी'वर आतापर्यंत ३३ कोटींचा खर्च; उपक्रम शासनाचा 'क्रेडिट' घेताहेत स्थानिक आमदार-खासदार

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com