Shasan Aplya Dari: 'शासन आपल्या दारी'वर आतापर्यंत ३३ कोटींचा खर्च; उपक्रम शासनाचा 'क्रेडिट' घेताहेत स्थानिक आमदार-खासदार

Shinde-Fadnavis-Pawar government : 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम विरोधकांच्या 'रडार'वर; या उपक्रमासाठी पैशाची उधळपट्टी होत असल्याचा केला आरोप
CM Shinde, Fadnavis, Pawar government
CM Shinde, Fadnavis, Pawar government Sarkarnama

Pimpri News: शासकीय योजना जनतेपर्यंत पोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'शासन आपल्या दारी' हा उपक्रम सुरु केला असून त्याच्या फक्त १५ भागांवर आतापर्यंत ३३ कोटी ३३ लाख रुपये खर्च झाले आहेत. एका कार्यक्रमावर जनतेचे सव्वादोन कोटी रुपये खर्च होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा 'ड्रीम प्रोजेक्ट' आता विरोधकांच्या 'रडार'वर आला आहे. त्यात दिले जाणारे दाखले हे एरव्हीही सरकारी कार्यालयातून मिळत असताना, मग त्यावर कोट्यवधी रुपयांचा हा चुराडा का, असा सवाल विरोधकांनी केला आहे.

आतापर्यंत असे १५ शासन आपल्या दारीचे सोहळे झाले आहेत. मात्र, ते सत्ताधारी पक्षाच्या स्थानिक आमदार, खासदारांनीच 'हायजॅक' केल्याने ते आणखी वादात सापडले आहेत. राज्य सरकारचा हा उपक्रम असला, तरी तो जणूकाही आपणच घेत असल्याच्या थाटात त्याचे श्रेय सत्ताधारी लोकप्रतिनिधी घेत आहेत. त्याला दुजोरा पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या या उपक्रमातून मिळालेला आहे.

CM Shinde, Fadnavis, Pawar government
Parliament Special Session: दिल्लीत राजकीय घडामोडी वाढल्या; काँग्रेसकडून खासदारांना व्हीप जारी

दुसरं म्हणजे विरोधकांना त्यात सहभागी करून घेतले जात नाही. एवढेच नाही, तर उलट या व्यासपीठावरून आपली पाठ थोपटून घेत सत्ताधारी पक्ष विरोधकांवर टीका करण्याची संधी घेत असल्यामुळेही हा कार्यक्रम आता वादाच्या भोवऱ्यात अडकू लागला आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 'शासन आपल्या दारी' ही जनतेच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा हल्लाबोल बुधवारी केला.

'शासन आपल्या दारी'चा एक कार्यक्रम घेण्यासाठी किमान दोन कोटी वीस लाख रुपये खर्ची पडतात. त्याशिवाय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सरकारी लवाजमा याची ये-जा, बडदास्तीवरील लाखो रुपयांचा खर्च हा वेगळाच. जेजूरीत, (जि.पुणे) तर हा कार्यक्रम तीन वेळा रद्द झाला होता. त्यामुळे तीनवेळची तयारी आणि त्यावरील खर्च हा पाण्यातच गेलेला आहे.

आता नुकताच हा कार्यक्रम जळगावात झाला. त्यावेळी या उपक्रमामुळे विरोधकांचे संतुलन बिघडले असल्याने ते यावर टीका करीत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. आता पुढे 'शासन आपल्या दारी' हे राज्याचे कृषीमंत्री धनजंय मुंडे यांच्या परळीत या महिन्याच्या शेवटी पार पडणार आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्लूडी) काढलेल्या टेंडरची प्रत 'सरकारनामा'च्या हाती लागली. त्यात या एका कार्यक्रमाचा खर्च हा दोन कोटी वीस लाख असल्याचे दिसून आले आहे.

Edited by Ganesh Thombare

CM Shinde, Fadnavis, Pawar government
India Aghadi's Lok Sabha Strategy : इंडिया आघाडीचं ठरलं; जागावाटप राज्यपातळीवरच होणार, राष्ट्रीय नेते करणार शिक्कामोर्तब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com