चंद्रपूर : समाजातील विषमता दूर न करता केवळ ध्रुवीकरण करून सत्ता हस्तगत करणे सुरू आहे. जात, धर्म, क्षेत्र, भाषा यांसह अन्य विविध प्रकारे सध्या देशात उपद्व्याप सुरू आहेत. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर आताच ही परिस्थिती का निर्माण झाली, ही बाब चिंतनीय असल्याचे खासदार मुकुल वासनिक (MP Mukul Wasnik) यांनी सांगितले.
रुपया घसरला, तर देशाच्या पंतप्रधानपदाची (Prime Minister) प्रतिष्ठा घसरत असल्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी (Narendra Modi) आता मात्र स्वतः पंतप्रधान असताना त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. देशात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय राज्यघटनेमुळे देशात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद टिकवून ठेवता आला. परंतु, सध्या भारतीय घटनेला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील एकतेला धोका निर्माण होऊ शकते.
या यात्रेत राज्यातील लाखो काँग्रेस (Congress) कार्यकर्ते व नागरिक यात्रेत सहभागी होणार आहे. चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यातून खासदार बाळू धानोरकर (MP Balu Dhanorkar) यांच्या नेतृत्वाखाली 25 हजारपेक्षा जास्त कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने यात्रेत सहभागी होणार आहेत. हजारो तरुण बाईक रॅली काढून यात्रेला आपला पाठिंबा देणार आहे. भारत जोडो यात्रेचा 3500 किलोमीटरचा प्रवास हा काँग्रेस पक्षासाठी आणि संपूर्ण देशासाठी ऐतिहासिक घटना आहे. ही भारत जोडो यात्रा सात नोव्हेंबरपासून महाराष्ट्रामध्ये येत आहे. सात ते 11 नोव्हेंबर दरम्यान ती नांदेड जिल्ह्यात, 11 ते 15 नोव्हेंबर दरम्यान हिंगोली जिल्ह्यात, 15 ते 16 नोव्हेंबर रोजी वाशीम जिल्ह्यात, 16 ते 18 नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात आणि 18 ते 20 रोजी रोजी बुलढाणा जिल्ह्यात मार्गक्रमण करणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी वाशीम शहरातील अजनखेड, बोराला फाटा येथे १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता सहभागी होण्याचे आवाहन खासदार धानोरकर यांनी केले आहे.
देशात सध्या तानाशाही व्यवस्था निर्माण झाली आहे. देशातील विस्थापित हे अजुनही विस्थापित आहेत. तर, दुसरीकडे देशातील निवडक प्रस्थापितांकडे संपत्ती केंद्रित करण्याचा कार्यक्रम राबविला जात आहे. यातून भारत देश एकसंध राहील, असे दिसत नसल्याचेही वासनिक म्हणाले. संपूर्ण देशात कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडो यात्रा सुरू आहे. ही यात्रा ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातून राज्यात प्रवेश करणार आहे. पाच जिल्ह्यांत सुमारे ३८० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्यानंतर ही यात्रा मध्यप्रदेश राज्यात जाणार आहे. राज्यातील उर्वरित अन्य जिल्ह्यांना यात्रेत सहभागी होण्याचे सूचविण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना तशा सूचनासुद्धा देण्यात आल्या आहेत. १५ नोव्हेंबरला दुपारी ३.३० वाजता येथील पदाधिकाऱ्यांना वाशिम येथून यात्रेत सहभागी होता येणार आहे. पंचायत समिती, नगरपरिषद स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्तेसुद्धा यात्रेत सहभागी होणार असल्याचे वासनिक यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, माजी आमदार डॉ. अविनाश वारजूकर, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.