Jayesh Pujari who threatened Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा जयेश पुजारी यांच्यावर एनआयएने कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. कर्नाटकचे भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा आणि इतर नेत्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती चौकशीत उघडकीस झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. नागपूर शहरातील धंतोली पोलिसांनी जयेश पुजारीला बेळगावच्या कारागृहातून नागपुरात आणले होते. (He was brought to Nagpur from Belgaum Jail)
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात फोन करून धमकी देत खंडणी मागणाऱ्या जयेश पुजारीविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे दोन्ही प्रकरणांसह राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने कर्नाटकात गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई एनआयएला दिल्याची माहिती आहे.
धंतोली पोलिसांद्वारे या प्रकरणात जयेश पुजारी ऊर्फ कांथा याला बेळगावच्या कारागृहातून नागपुरात आणण्यात आले होते. त्यानंतर चौकशीत त्याने अनेक धक्कादायक खुलासे केले. त्यातून पोलिसांनी त्याच्यावर दुसऱ्यावेळी दिलेल्या धमकी प्रकरणात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत (युएपीए) लावला होता.
याशिवाय पोलिसांनी त्याने चौकशीदरम्यान नाव घेतलेल्या सर्व दहशतवादी संघटनांशी जुळलेल्या आणि बेळगाव कारागृहासह इतर कारागृहात असलेल्या दहशतवाद्यांचीही चौकशी केली. त्यातून बरेच काही सत्य बाहेर आल्याने धंतोली पोलिसांनी प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेद्वारे करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
गेल्या दोन दिवसांपासून एनआयएचे अधिकारी नागपुरात तळ ठोकून बसले असून लवकरच जयेशला अटक होणार आहे. दरम्यान जयेशने कर्नाटकचे (Karnataka) भाजपचे (BJP) ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा आणि इतर नेत्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती चौकशीत उघडकीस झाल्याने एनआयद्वारे त्यासह इतर सर्वच प्रकरणे एकत्रित करीत गुन्हा दाखल केला आहे.
कुठल्याही क्षणी अटक..
जयेशचे प्रकरण आता संपूर्णतः एनआयएकडे (NIA) गेल्याने त्याला आता कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी एनआयएचे अधिकारी हे नागपुरात (nagpur) आले असून ते सर्वच प्रकरणांतील कागदपत्रे तपासत आहेत. परिणामी जयेशला केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.