Munde On Rohit Pawar : राजकारणात येऊन तीन वर्षे झाली नाहीत, त्यांना ‘दादां’ची जागा घ्यायची असेल… मुंडेंचा पवारांना टोला !

Ajit Pawar : कदाचित त्यामुळेच अजित पवारांवर ते असले आरोप करत असतील.
Dhananjay Munde and Rohit Pawar.
Dhananjay Munde and Rohit Pawar.Sarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोवरील कारवाई राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून केली गेली असल्याचा थेट आरोप रोहित पवार यांनी केला आहे. यावर धनंजय मुंडे यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, बारामती ॲग्रो हा आजचा विषय आहे काय, याची माहिती अगोदर काढा विनाकारण कुणावरही बोट ठेऊ नका. (Perhaps that is why they are making such accusations against Ajit Pawar)

अजित पवारांनी चाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आदरणीय पवार साहेबांसमोर आणि जनतेसमोर स्वतःचे स्थान निर्माण केलं. अशा व्यक्तीची जागा ज्याला राजकारणात येऊन तीन वर्षे झालं नाही, त्याला घ्यावीशी वाटत असेल आणि कदाचित त्यामुळेच अजित पवारांवर ते असले आरोप करत असतील, असा टोला धनंजय मुंडेंनी रोहित पवारांना लगावला. ‘शिवारफेरी’ उपक्रमासाठी आज (ता. २९) अकोल्यात आले असता, मुंडे पत्रकारांशी बोलत होते.

...म्हणून कांद्याच्या बैठकीला गेलो नाही !

कांदाप्रश्नी दिल्लीत बैठक बोलावण्यात आली होती. मात्र, या बैठकीला राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पाठ फिरवली. यावरून राज्यात टीका होत असताना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याचे कारण स्पष्ट केले आहे.

कांद्याच्या बैठकीला उपस्थित राहण्याची माझी जबाबदारी नसून पणन विभागाची आहे. कांद्यावर लावण्यात आलेले ४० टक्क्यांचे निर्यातशुल्क रद्द करावे या मुद्द्यांवरून राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. व्यापाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत नाशिक जिल्ह्यात लिलाव बंद पाडले आहेत. याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी दिल्लीत आज (ता. २९) केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली.

या बैठकीला राज्यातील बड्या मंत्र्यांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. केवळ पणनमंत्री अब्दुल सत्तार हेच दिल्लीत दाखल झाले. या मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे, तर सरकारमध्ये नाराजी असल्याचं बोललं जातं असतानाच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज अकोल्यात शिवारफेरी उपक्रमासाठी आले असताना यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

अकोल्यातील कृषी विद्यापीठात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कार्यक्रमाला येत आहेत आणि या कार्यक्रमाच्या पत्रिकेत कृषिमंत्र्यांचं नाव असून, नसणं अन् उपमुख्यमंत्री यांचं नाव असून नसणं यावर पुन्हा तुम्ही आणखी कुणाची नाराजी असल्याच्या बातम्या चालू केल्या असतील. म्हणून कांद्याच्या बैठकीला ज्या पणन विभागाची जबाबदारी आहे. त्यासाठी पणनमंत्री अब्दुल सत्तार गेले आहेत. मी कृषी विभागाची जबाबदारी म्हणून कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमाला आलो असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Dhananjay Munde and Rohit Pawar.
Akola Embezzlement in scrap sale : भंगाराच्या विक्रीत अफरातफर करणं भोवलं, महापारेषणचे आठ अधिकारी निलंबित !

अजित पवार नाराज नाहीत...

अजित पवारांनी वर्षा निवासस्थानावरील गणेशोत्सवाकडे पाठ फिरवल्याने अजित पवार नाराज असल्याची चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता, मुंडे म्हणाले, माध्यमांना आमच्यावर नाराजी आहे का? कारण आमच्यात अशी काहीही नाराजी नाही. अजितदादा हे पुणे, बारामतीमधील महत्त्वाच्या आणि मानाच्या गणपतीच्या ठिकाणी दरवर्षी असतात.

अजित पवार मुख्यमंत्र्यांकडे गेले नाहीत, याचा अर्थ असा नाही की, ते नाराज आहेत. सरकारमध्ये कुठेही नाराजी नाही. विनाकारण माध्यमांनी काहीही प्रयत्न केले तरी काही उपयोग होणार नाही. महायुतीचे सरकार एक दिलाने जनतेच्या हितासाठी काम करीत असल्याचे धनंजय मुंडे म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Dhananjay Munde and Rohit Pawar.
Akola Ganpati Visarjan: पोलिस बंदोबस्ताशिवाय गणपती विसर्जनाची मिरवणूक; पोलिस निरीक्षकाचा अनोखा प्रयोग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com