Mungantiwar On 'INDIA' : खूप अंधार असतो, तेव्हा लहान मुले एकमेकांचे हात घट्ट पकडतात, ‘इंडिया’चेही तसेच आहे !

Congress : कॉंग्रेसच्या खासदारांचा आकडा ६० ते ६२च्या वर दाखवलेला नाही.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama

Maharashtra Political News : भारतीय जनता पक्ष ‘इंडिया’च्या बैठकीला घाबरला, असं म्हणणाऱ्यांची कीव येते आणि त्यांच्याबद्दल सहानुभूतीही वाटते. आत्ताही जे-जे सर्व्हे आले, त्यामध्ये कॉंग्रेसच्या खासदारांचा आकडा ६० ते ६२च्या वर दाखवलेला नाही. भाजप आणि एनडीएचे ३०३ खासदार आजही सर्व्हेमध्ये दाखवले गेले आहेत. तरीही उसने अवसान आणून सर्व पक्ष एकमेकांची हिंमत वाढवत आहेत, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. (The country is making progress one by one)

आज नागपुरात साम टीव्हीशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, जेव्हा खूप अंधार असतो, तेव्हा लहान मुले एकमेकांचा हात मजबूत पकडतात. तशीच ‘इंडिया’ची स्थिती झाली आहे. त्यांना आता भिती वाटत आहे. कारण देश प्रगतीची एक एक शिखरं पादाक्रांत करीत आहे.

आता चांद्रयान चंद्रावर पोहोचले. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आम्ही आदित्य यान पाठवत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) याच वेगाने पुढे जात राहिले, तर आपल्या राजकारणात खूप अंधार येईल, अशी भीती त्यांना असल्यामुळे ते एकत्र आलेले आहेत.

ज्याला तुम्ही घाबरलेले म्हणत आहात, हे चुकीचे आहे. जनता मोदींच्या सोबत आहे. उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) तुमची काय. त्यापेक्षा येथे अपक्ष जास्त आहेत. बिहारमध्ये त्यांची ताकद काय, हे जरा त्यांनी तपासून बघावे. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशी वाक्ये वापरली जातात, हे समजल्या जाऊ शकते. हे म्हणजे मला पाहून १० वाघ घाबरले, असे एका सशाने म्हणण्यासारखे आहे, असे सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) म्हणाले.

Sudhir Mungantiwar
Mungantiwar On 'That' Statement : तुम्ही ट्विस्ट करू नका, व्यक्तीवर आधारित पक्ष, राजकारण आवडत नाही, असं मी म्हणालो !

एकमेकांबद्दल आस्था, प्रेम असे काहीही ‘इंडिया’मध्ये नाहीये. अधीर रंजन आणि ममता बॅनर्जींमध्ये काय प्रेम आहे. बिहारमध्ये लालुप्रसाद यादव आणि नितीश कुमार यांच्यामध्‍ये कॉंग्रेसचा काय वाटा आहे? येथे शरद पवारांना अजित पवारांची भेट घेतली की सामनामध्ये काय अग्रलेख येतो. फक्त मोदी पुन्हा येऊ नये, या भीतीपोटी ते एकत्र आले आहेत. त्यांच्याकडे पंतप्रधानपदाचा नेता नाही. चर्चेवर प्रभाव पाडायचा कॉंग्रेसचा प्रयत्न आहे.

उत्तर प्रदेश, पश्‍चिम बंगालमध्ये आज कॉंग्रेसची काय स्थिती आहे, हेसुद्धा त्यांनी बघावे. लोगो ठरला नाही, पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरला नाही. सत्तेत असताना काय कामे केली, कर्ज किती फेडले, महसूल किती होता. किती किलोमीटर रस्ते बांधले, किती एम्स हॉस्पिटल केले, याची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत. त्यांनी एक एम्स केलं आम्ही २१ एम्स केले, असे त्यांनी सांगितले.

ईडी, सीबीआय तुम्हीच निर्माण केला. डॉ. विक्रम साराभाई गुजरातचे आहेत. एरवी गुजरातवर टिका करता मग साराभाईंच्या बाबतीत का टिका नाही करत, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com