महानगरपालिका : सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी ‘ही’ आहे खूश खबर...

१० नगरसेवक बसपाचे आहेत. 10 Corportors of BSP शिवसेना, राष्ट्रवादी नगरसेवकांची संख्या मोजायला बोटांचीही गरज नाही.
Nagpur Municipal Corporation
Nagpur Municipal CorporationSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : अनेक वर्षांपासून उमेदवारी आणि महापालिकेची निवडणूक लढण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांतील कार्यकर्त्यांसाठी खूश खबर आहे. राज्य सरकारने महापालिकांमधील नगरसेवकांची संख्येत १५ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नागपूरमध्ये नगरसेवकांची संख्या २२ ने वाढणार आहे. नागपूरमध्ये विद्यमान नगरसेवकांची संख्या १५१ इतकी आहे.

राज्यातील नगरपालिका आणि महापालिकांमधील नगसेवकांच्या संख्येत वाढ करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी प्रदान केली. फक्त मुंबई महापालिकेत नगरसेवकांची संख्या वाढणार नाही. राज्य सरकारने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाने नव्याने प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश स्थानिक प्रशासनाला दिला आहे. यात आता १५ टक्के नगरसेवकांची भर पडणार असल्याने प्रभाग रचनाकारांची डोकेदुखी वाढणार आहे.

नगरसेवकांच्या संख्या वाढीच्या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्ते चांगलेच खूश झाले आहेत. महापालिकेत उमेदवारी मागण्यांची संख्या हजारोंच्या घरात असते. मात्र जागा १५१ असल्याने ८० टक्के कार्यकर्ते नाराज होतात. काँग्रेसमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला मिळेल याचा नेम नसतो. सर्वच गॅसवर असतात. उमेदवारी दाखल करायच्या दिवशी यादी जाहीर केली जाते. त्यातही अनेकांना यादी नाव असतानाही ए.बी. फॉर्म मिळत नाही. त्यामुळे चांगलेच घमासान होते. नाराज झालेले निवडणुकीच्या वेळी याचा वचपा काढतात. अशी परिस्थिती आता भाजपची झाली आहे. कार्यकर्ते अधिक आणि जागा मर्यादित असल्याने शहराध्यक्षांचा तिकीट वाटप करताना चांगलाच कस लागतो. वाढीव नगरसेवकांच्या निर्णयामुळे पक्षांच्या अध्यक्षांना थोडा दिलासा मिळणार आहे.

Nagpur Municipal Corporation
...तर नागपूर महानगरपालिका पुन्हा भाजपच्याच ताब्यात राहील !

सत्ता स्थापनेसाठी गाठावा लागणार ८७चा आकडा

नगरसेवकांची संख्या वाढल्यास नागपूर महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी ८७चा जादूई आकडा गाठावा लागणार आहे. पूर्वी ७५ नगरसेवक पुरेसे असायचे. भाजपकडे सध्या सर्वाधिक १०८ तर काँग्रेसकडे २९ नगरसेवक आहेत. त्याखालोखाल सर्वाधिक १० नगरसेवक बसपाचे आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी नगरसेवकांची संख्या मोजायला बोटांचीही गरज नाही. महापालिकेत महाविकास आघाडी कायम राहिल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादीला बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com