Murtijapur APMC : मुर्तिजापुरात भैय्यासाहेबांनी राखली अविरोध निवडीची परंपरा !

Akola : परिवर्तन पॕनलच्या नावाखाली विरोधकांनी मोट बांधली होती.
Murtijapur APMC
Murtijapur APMCSarkarnama
Published on
Updated on

Akola District's Murtijapur APMC Election News : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी ज्येष्ठ सहकार नेते माजी आमदार ॲड. भैयासाहेब तिडके यांची, तर उपसभापतिपदी युवा संचालक प्रशांत कांबे यांची बिनविरोध निवड झाली. (Youth Director Prashant Kambe was elected unopposed)

गेली ३० वर्षे सत्ता असणाऱ्या सहकार पॕनलला परिवर्तन पॕनलच्या नावाखाली विरोधकांनी मोट बांधली होती. परंतु १८ पैकी १५ जागा ताब्यात घेत सहकार पॕनलने त्यांचे आव्हान लीलया पेलले. आजवर शेतकरी हिताच्या योजना राबविणाऱ्या ॲड. भैयासाहेब तिडके यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शेतकरी, व्यापारी बांधवांनी विश्वास दाखविला.

सर्वांच्या आग्रहाखातर ॲड.भैयासाहेब तिडके यांचा सभापती पदासाठी, तर प्रशांत कांबे यांचा उपसभापतिपदासाठी नवनिर्वाचित संचालकांच्या काल (ता. १७) झालेल्या पहिल्या सभेनंतर उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यांच्या विरोधात एकही अर्ज न आल्याने दोघांची निवड अविरोध होऊन सहकार पॕनलने अविरोध निवडीची परंपरा कायम ठेवली. या बाजार समितीचे प्राधिकृत अधिकारी ए.एस. शास्त्री यांचे अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली.

सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर केलेल्या सुहास तिडके यांचे सूचक म्हणून दिवाकर गावंडे व अनुमोदक गणेशराव महल्ले तर उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र सादर करणारे प्रशांत कांबे यांचे सूचक अमित कावरे तर अनुमोदक साहेबराव ठाकरे हे होते. विषय पत्रिकेनुसार बाजार समितीच्या सभापती व उपसभापती या पदाची निवडणुकीची (Election) संपूर्ण कार्यवाही आटोपल्यानंतर दोन्ही पदांची अविरोध निवड झाल्याचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक निबंधक ए.एस. शास्त्री यांनी जाहीर केले.

Murtijapur APMC
Akola riots : कॅमेऱ्यात जे दिसले, त्यांना अटक करून उपयोग नाही; त्याच्या मागे कोण, हे शोधा…

कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक ॲड. सुहास उपाख्य भैयासाहेब भगवंतराव तिडके, प्रशांत वसंतराव कांबे, डॉ. अमित रामदासपंत कावरे, दिवाकर पंजाबराव गावंडे, साहेबराव शामराव ठाकरे, आनंद रामकृष्ण पाचडे, अरुण सदाशिव सरोदे, गणेश किसनराव महल्ले, विष्णू रामराव चुडे, शोभा रामदास तिडके, नारायण पांडुरंग भटकर, चित्रा नरेंद्र सरोदे, मोहनराव नाजूकराव गावंडे, दादाराव पुंडलीक किर्दक, अक्षय जितेंद्र राऊत, किर्तीकुमार हरीओम भारुका, श्यामसुंदर बजरंग अग्रवाल, अब्दुल मुजाहिद अब्दुल कय्युम उपस्थित होते.

आजवर शेतकऱ्यांच्या (Farmers) हिताच्या योजना बाजार समितीच्या (APMC) माध्यमातून राबविल्या आहेत. यापुढेही शेतकरी हितालाच अग्रक्रम देण्यात येईल, असे निवड झाल्यानंतर ॲड. भैयासाहेब तिडके म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com