Murtijapur APMC Election Result: ‘या’ माजी आमदारांनी लीलया पेलले वंचितचे आव्हान, ३० वर्षांपासूनचे वर्चस्व कायम !

Murtizapur Bazar Samiti Election Result: शेतकरी सहकार पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले होते.
Murtijapur APMC
Murtijapur APMCSarkarnama

Akola District's Murtijapur APMC Election Result : १८ पैकी तब्बल १५ जागा काबीज करत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार ॲड. भैय्यासाहेब तिडके यांच्या नेतृत्वातील शेतकरी सहकार पॅनलने मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवरील आपली ३० वर्षांपासून असलेली सत्ता कायम राखली. (The challenge was met by the Farmers' Cooperative Panel)

या निवडणुकीत व्यापारी-अडते मतदार संघातून शेतकरी सहकार पॅनलचे दोन उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले होते. यावेळी प्रथमच वंचित बहुजन आघाडीने इतर राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमवेत आघाडी करून सहकार पॅनलकडून उमेदवारी न मिळू शकलेल्यांना सोबत घेऊन आव्हान दिले होते. परंतु ते आव्हान शेतकरी सहकार पॅनलने लीलया पेलले.

या बाजार समितीत सत्ता परिवर्तन घडवून आणण्याचे परिवर्तन पॅनलचे स्वप्न दिवास्वप्नच ठरले. या निवडणुकीच्या रिंगणातील शेतकरी संघटनेसह इतरही काही मंडळींचा दारुण पराभव झाला. शेतकरी सहकार पॅनलचे सेवा सहकारी मतदार संघात ॲड. भैय्यासाहेब तिडके, प्रशांत कांबे, दिवाकर गावंडे, डॉ.अमित कावरे, साहेबराव ढाकरे, आनंद पाचडे, अरूण सरोदे, शोभा तिडके, चित्रा सरोदे, गणेश महल्ले, विष्णू चुडे निवडून आले. (Political Breaking News)

ग्रामपंचायत मतदारसंघात दादाराव किर्दक व अक्षय राऊत विजयी झाले. हमाल मापारी मतदारसंघात अपक्ष मुजाहीद हुसेन विजयी झाले. शेतकरी परिवर्तन पॅनलचे केवळ ग्रामपंचायत मतदार संघातील मोहन गावंडे व नारायण भटकर हे दोन उमेदवार विजयी झाले.

Murtijapur APMC
Dhamangaon APMC Election Result : धामणगावात माजी आमदारांनी विद्यमान आमदारांना चारली धूळ !

सहकारात आपला अजूनही दबदबा आहे, हे माजी आमदार भैय्यासाहेब तिडके यांनी या निवडणुकीतून दाखवून दिले. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांप्रमाणे भाजपला येथेही कामगिरी करता आली नाही. या निवडणुकीवर आगामी निवडणुकांचे चित्र अवलंबून असेल. त्यामुळे काल लागलेल्या निकालाला विशेष महत्व आहे. (Latest Vidarbha News)

या निवडणुकांचा (APMC Election) जिल्हा परिषद, (ZP) नगर पंचायत किंवा विधानसभा निवडणुकांवर काहीही फरक पडत नाही, राजकीय नेते (Political Leaders) असे कितीही सांगत असले तरी काही तरी परिणाम निश्चित होतो. त्यामुळेच सर्व राजकीय पक्ष बाजार समित्या ताब्यात ठेवण्यासाठी संपूर्ण जोर लावतात. साम, दाम, दंड, भेद सर्वकाही करून या निवडणुका (Elections) लढल्या जातात. या निवडणुकीतील हार-जीत वर बरेच काही अवबंलून असते.(Political Short Videos)

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com