Nagpur Aap News : शहरात धुव्वाधार पाऊस, मारबतीची धूम; त्यात ‘आप’ने जाळला पाकिस्तानचा बडग्या !
Nagpur Political News : पोळ्याच्या करीला नागपुरात निघणारी मारबत व बडग्यांची मिरवणूक संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. समाजातून अनिष्ट प्रथा, संकटं आणि वाईट गोष्टी घेऊन जाण्याची प्रार्थना मारबतीला करण्यात येते. याशिवाय अनेक बडग्यांच्या माध्यमातूनही वेगवेगळ्या विषयांकडे लक्ष वेधण्यात येते. (Marbati is prayed to take away auspicious practices, calamities and evils)
शुक्रवारी, १५ सप्टेंबरला नागपुरात निघालेल्या या मिरवणुकीत एका राजकीय पक्षाचे आंदोलन लक्षवेधी ठरले. काश्मिरातील अनंतनाग जिल्ह्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराच्या चार जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या घटनेचा निषेध व्यक्त करीत आम आदमी पक्षाने तान्हा पोळ्याच्या निमित्ताने शहरातून निघणाऱ्या मारबत मिरवणुकीदरम्यान पाकिस्तानच्या बडग्याचे दहन केले.
महाल परिसरात असलेल्या बडकस चौकात हे आंदोलन करण्यात आले. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री भूषण ढाकुलकर, शहराध्यक्ष अजिंक्य कांबळे, शहर महासचिव श्याम बोकाडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.
अनेकदा तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तानने भारतविरोधी कारवाया अद्यापही थांबविलेल्या नाहीत. स्वत:च्या देशाला भिकेचे डोहाळे लागले असतानाही पाकिस्तान भारताविरोधात खुरापती सुरूच ठेवत आहे. त्यामुळे पाकिस्तानने वेळीच आपली लायकी ओळखत हे प्रकार थांबवावेत, असा संताप आम आदमी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
आतापर्यंत झालेल्या अनेक युद्धांमध्ये भारताने (India) पाकिस्तानला धडा शिकवला आहे. परंतु त्यानंतरही पाकिस्तानातील (Pakistan) सत्ताधारी आणि धर्मांध शक्तींना शहाणपण सुचलेले नाही, असे नमूद करीत ढाकुलकर यांनी पाकिस्तानचा निषेध व्यक्त केला. पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. तेथील लोक अन्न, वस्त्र, निवाऱ्यासाठी वणवण भटकत आहेत.
अशात आपल्या देशातील अराजकता सांभाळण्याऐवजी पाकिस्तान भारतविरोधी कारवाया करीत आहे. हा प्रकार म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याचे शहराध्यक्ष कांबळे यांनी नमूद केले. भारतीय लष्कराने मनात आणल्यास काही तासातच पाकिस्तानाच्या कानाकोपऱ्यात भारताचा तिरंगा फडकाविणे शक्य आहे. ही बाब पाकिस्तानने विसरू नये.
भारतीय लष्करावर करण्यात येणारे हल्ले पाकिस्तानने तातडीने थांबवावे, असे नागपूर (Nagpur) शहर महासचिव श्याम बोकडे यावेळी म्हणाले. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी भारतीय लष्करावर केलेल्या हल्ल्याचा ‘आप’च्या तीनही नेत्यांसह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
आंदोलनात डॉ. शाहिद जाफरी, नागपूर शहर उपाध्यक्ष संगिता बाथो, बिपीन कुर्वे, नागपूर शहर संघटन मंत्री रोशन डोंगरे, सोनू फटींग, सचिन लोणकर, शैलेश गजभिये, युवा अध्यक्ष शुभम मोरे, गिरीश तितरमारे, विशाल वैद्य दीपक बातकोरे, सूचना गजभिये, स्वप्निल सोमकुवर, चेतन निखारे, हरीश वेडेकर, पंकज मेश्राम, पायल शेंडे, तेजराम शाहू, उमाकांत बनसोड चैताली रामटेके संदीप कोवे अमर बाथो, संजय पाटील, प्रतीक सोनकाडे, प्रमोद नितनवरे, प्रतीक पाटील, अक्षय नीतनवरे, भीमरत्न गाडेकर, हेमंत भुजाडे, राजकुमार पकीडे यांच्यासह आम आदमी पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Edited By : Atul Mehere
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.