AAP Political News : मोदींचा 'विजयरथ' रोखण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीला 'आप'चा मोठा धक्का, 'या' राज्यात स्वबळाचा नारा

INDIA Alliance : '' काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारे आम्ही जागावाटप करणार नाही...''
Modi -Gandhi - Kejariwal
Modi -Gandhi - Kejariwal Sarkarnama

New Delhi : आगामी लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर भाजप सरकार विरोधात देशात काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी एकवटली आहे. २८ विरोधी पक्षांचा आघाडीत समावेश आहे. इंडिया आघाडीचा मुख्य उद्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्यापासून रोखणं हाच आहे.

आतापर्यंत इंडिया आघाडीच्या पाटना, बेंगळुरु आणि मुंबई येथे मोठ्या बैठका पार पडल्या आहेत. विरोधकांच्या या आघाडीवर भाजपकडून कायम टीकेची झोड उठवली जाते. याचदरम्यान, आता इंडिया आघाडीतील आम आदमी पक्षाने मोठा निर्णय घेतला आहे.

Modi -Gandhi - Kejariwal
Bharat Vs INDIA Row : 'भारत' जोडो' नावाने यात्रा काढता, मग त्या नावाने काळीज का धडधडतंय ? भाजपच्या वाघांनी काँग्रेसला डिवचलं

पंजाब सरकारमधील मंत्री अनमोल गगन मान यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष(AAP) पंजाबमध्ये काँग्रेसशी काँग्रेस किंवा इंडिया आघाडी म्हणून नाही लढणार नसल्याचे जाहीर केले आहे. पंजाबमधील लोकसभेच्या १३ जागांवर आप स्वतंत्रपणे लढणार आहे. काँग्रेससोबत कोणत्याही प्रकारे आम्ही जागावाटप करणार नाही, असंही मान यांनी यावेळी म्हणाले. आपचा हा निर्णय म्हणजे नरेंद्र मोदींचा विजयपथ रोखण्यासाठी निघालेल्या इंडिया आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Modi -Gandhi - Kejariwal
AAP Vs Congress : 'इंडिया'त वादाची पहिली ठिणगी ? दिल्लीतील लोकसभेच्या जागांवरून 'आप' काँग्रेसवर भडकली

मंत्री अनमोल मान म्हणाले, पंजाबच्या १३ जागांवर आम आदमी पार्टी स्वतंत्र लढणार आहे. पंजाबमध्ये काँग्रेससोबत कोणतीही आम्ही आघाडी करणार नाही. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर पंजाबचे लोक प्रेम करतात, लोकांनी इमानदार माणसाची निवड केली आहे. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी होणं शक्य नाही असं मंत्री अनमोल मान यांनी स्पष्ट केलं आहे.

Modi -Gandhi - Kejariwal
Nitin Gadkari News : माजी नगरसेवकाने सांगितली अडचण, अन् गडकरींच्या थेट संचालनालयाला सूचना !

काँग्रेस आघाडीतील महत्त्वाचा आणि मोठा पक्ष

इंडिया आघाडीत आता महत्त्वाचा मुद्दा जागा वाटपाचा आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार? काँग्रेस आघाडीतील महत्त्वाचा आणि मोठा पक्ष आहे. त्यांच्या वाट्याला जागा किती येणार? आघाडीचा संयोजक कोण असेल? यासंबंधी निर्णय अजून झालेला नाही. आता 13 सप्टेंबरला शरद पवार(Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होईल. या बैठकीत पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणूक आणि 18 तारखेपासून सुरु होणाऱ्या संसदेच्या विशेष अधिवेशनाची रणनीती ठरेल. .

...यापुढे इंडिया आधाडीच्या अशा बैठका होणार नाही

आता इंडिया आघाडीच्या पटना, बेंगळुरू आणि मुंबईप्रमाणे बैठका होणार नाहीत. या तिन्ही शहरात इंडिया आघाडीच्या मोठ्या बैठका पार पडल्या. वेगवेगळ्या राज्यांचे मुख्मयंत्री, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या बैठकीत सहभागी झाल्या होत्या. इंडिया आघाडीच एक विराट रुप या बैठकांमध्ये दिसलं होतं.

Modi -Gandhi - Kejariwal
Ambadas Danve Maratha Reservation : मोठी घडामोड: ठाकरे गटाचे आमदार-खासदार राज्यपालांच्या भेटीला ; मराठा आरक्षणासंदर्भात...

आता मात्र यापुढे इंडिया आघाडी(India Alliance) च्या अशा बैठका होणार नसल्याची माहिती आहे. इंडिया आघाडीची चौथी बैठक मध्य प्रदेश भोपाळ आणि पाचवी बैठक पश्चिम बंगाल कोलकातामध्ये पार पडणार होती. पण आता या बैठका रद्द झाल्या आहेत. यापुढे इंडिया आघाडीत समन्वय समितीची महत्त्वाची भूमिका असेल. इंडिया आघाडीने स्थापन केलेली 13 जणांची समन्वय समिती निर्णय घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com