BJP News : नागपूरमध्ये भाजपचे नगरसेवक एकमेकांवर तुटून पडले.. राड्यानंतर प्रकरण पोलीस स्टेशनपर्यंत!

Yerakheda Nagar Panchayat Dispute : असंतुष्ट कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. निवडणुकीनंतर गजानन तिरपुडे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, १६ जानेवारी रोजी झालेल्या स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत मनोज बडवाईक यांची निवड झाली. या निर्णयानंतर नाराजी उफाळून आली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 20 Jan : नागपुरातील कामठी तालुक्यातील येरखेडा नगरपंचायतमध्ये सत्ता स्थापनेनंतर अवघ्या काही दिवसांतच भाजपमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. स्वीकृत सदस्याच्या निवडीवरून पक्षातील दोन गटांमध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले असून, हे मतभेद थेट हाणामारीपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.

येरखेडा ग्रामपंचायत असताना काँग्रेसची सत्ता होती. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नातून येरखेडाला नगरपंचायतचा दर्जा मिळाला. त्यानंतर झालेल्या पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत भाजपने अध्यक्षपदासह बहुमत मिळवून सत्ता स्थापन केली. मात्र उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच भाजपमध्ये दोन गट निर्माण झाले होते.

असंतुष्ट कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांना हस्तक्षेप करावा लागला होता. निवडणुकीनंतर गजानन तिरपुडे यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली. दरम्यान, १६ जानेवारी रोजी झालेल्या स्वीकृत सदस्यांच्या निवडणुकीत मनोज बडवाईक यांची निवड झाली. या निर्णयानंतर नाराजी उफाळून आली.

Chandrashekhar Bawankule
ZP Elections 2026 : काँग्रेसला नवा भिडू मिळाला: ZP एकत्र लढणार, भाजपची डोकेदुखी वाढणार; ग्रामीण भागाचे राजकारण बदलणार

सोमवारी (ता.१९) गटनेते व स्वीकृत सदस्य पदाच्या उमेदवारांमध्ये झालेला वाद हाणामारीत रूपांतरित झाल्याचे सांगण्यात येते. हा प्रकार पोलिसांपर्यंत गेल्याने भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघडकीस आला असून, पुढील काळात त्याचे राजकीय परिणाम दिसून येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Chandrashekhar Bawankule
Manikarnika Ghat controversy : 'मणिकर्णिका घाटावर बुलडोझर; शं‍कराचार्यांना स्नान करण्यापासून रोखलं, भक्तांवर लाठीमार, भाजप सरकारच्या कारवाईने हिंदुत्व गंगेस मिळाले...'

स्थानिक तहसिल कार्यालयातील हाणामारी नंतर दोन्ही गट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास आले होते. दोघांचीही लेखी तक्रार घेण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपसी समझोता झाल्याचे सांगितल्याने दोन्ही गटाकडून आम्हाला तक्रार करावयाची नसल्याचे व पुढेही कोणताही वाद होणार नसल्याचे लेखी लिहून दिले आहे, अशी माहिती नवीन कामठी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com