Gram Panchyat Election : ओबीसी यात्रेनं विरोधकांना गेलं जड, आता देशमुख करताहेत मजबूत भाजपचा गड

Ashish Deshmukh : नागपूर जिल्ह्यात भाजप करतेय व्यापक जनसंपर्क
Dr. Ashish Deshmukn in Public Meeting.
Dr. Ashish Deshmukn in Public Meeting.Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur Political News : राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३६५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय, पण भाजपनं आपला गड अभेद्य राखण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केलीय. विशेष म्हणजे भाजपच्या ओबीसी यात्रेतील यशानंतर एका नेत्यानं जिल्ह्यात भाजपचा जनसंपर्क वाढविण्याची जबाबदारी घेतलीय.

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. त्यानिमित्तानं भाजप नेते माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी शेवटच्या टप्प्यात भाजपची बाजू भक्कम करण्यासाठी चांगलाच जोर लावलाय. वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सभा, नेत्यांचे दौरे यामुळं सध्या नागपूर जिल्ह्याती राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. (Nagpur BJP leader Dr. Ashish Deshmukh strengthens BJP's stronghold in Gram Panchayat elections)

ठिकठिकाणी जाहीर सभा, बैठकींचं आयोजन, प्रचार रॅली, प्रत्यक्ष जनसंपर्काच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जातोय. कुही तालुक्यातील पचखेडी, वेलतूर,

रामटेक तालुक्यांतील शितलवाडी आदी गावांमध्ये भाजपनं आपलं पॅनेल विजयी व्हावं, यासाठी डॉ. देशमुख यांच्या माध्यमातून चांगलाच जोर लावलाय. माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी हेदेखील कामाला लागले आहेत. ग्रामपंचायतस्तरावरील राजकारण राज्यातील पक्षीय राजकारणापेक्षा बरंच वेगळं असतं, असं नेहमीच म्हटलं जातं. येथे मैदानात असलेल्या पॅनेलला अधिक महत्त्व असतं. सध्या भाजपनं युवाक्रांती जनकल्याण परिवर्तन पॅनेल, ग्रामविकास परिवर्तन पॅनेल अशा विविध नावानं आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गटांनीही आपल्या पद्धतीनं जोर लावणं सुरू ठेवलंय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भाजपनं अलीकडेच राज्यामध्ये ओबीसी यात्रा काढली होती. या यात्रेला व्यापक प्रतिसाद मिळाला. विशेषत: नागपूरच्या ग्रामीण भागातून मिळालेला प्रतिसाद बघता यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत या प्रतिसादाचं मतांमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न भाजप करीत आहे. त्यामुळंच त्यांनी नागपूर जिल्ह्यातील अनेक भागातील ग्रामपंचायत निवडणुकीत जनसंपर्काची जबाबदारी डॉ. आशिष देशमुखांवर सोपवलीय.

केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे ग्रामीण भागातील विकासावर कसा सकारात्मक परिणाम झाला, हे नमूद करीत डॉ. आशिष देशमुख व भाजपचे सहकारी नेते गावागावांत भाजपची पाळमुळं अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

(Edited By : Atul Mehere)

Dr. Ashish Deshmukn in Public Meeting.
Roads issue in Nagpur : लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांदेखत बुजविली जातेय सर्वांत जुनी ड्रेनेज लाइन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com