Roads issue in Nagpur : लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांदेखत बुजविली जातेय सर्वांत जुनी ड्रेनेज लाइन

Concreting Work : नागपुरातील नंदनवन पाण्याखाली जाण्याचा धोका
Nagpur Road
Nagpur RoadSarkarnama

Signs of a new crisis : काही दिवसांपूर्वी नागपूर शहरात २४ तासांत झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सुरुवातीला या प्रकाराला ढगफुटीचं नाव देण्यात आलं. परंतु केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात ड्रेनेजची व्यवस्थाच नसल्यानं हा पूर आल्याचं पुढं आलं. या प्रकारामुळं नागपुरात आता नागरिक सिमेंटच्या रस्त्यांना विरोध करू लागले आहेत. मात्र, असं असतानाही लोकप्रतिनिधींच्या डोळ्यांदेखत शहराच्या नंदनवन भागातील ५० वर्षे जुनी ड्रेनेज लाइन बुजविण्यात आलीय. तीदेखील सिमेंटच्या रस्त्यासाठीच.

नंदनवन चौक ते गणेशनगरदरम्यान सिमेंट काँक्रीट रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. रस्तानिर्मिती करणाऱ्या ठेकेदारानं या भागातील सुमारे ५० वर्षे जुनी ड्रेनेज लाइन मलबा टाकून बुजवलीय. त्यामुळं पश्चिम नागपुरातील वस्त्या पुढच्या पावसाळ्यात पाण्यात बुडण्याची शक्यता निर्माण झालीय. (Risk of rainwater will increase in Nagpur after the oldest drainage line was extinguished for cement roads)

यंदा पावसानं कधी नव्हे ते पश्चिम नागपुरातील अनेक वस्त्या पाण्याखाली बुडल्या होत्या. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं कोट्यवधीचं नुकसान झालं. मात्र, ड्रेनेज लाइन असल्यानं नंदनवनमध्ये एकाही घरात पाणी शिरलं नव्हतं. शहरातील अन्य भागांमध्ये नाग नदीचा नाला, सिमेंट रोडची उंची आणि या रस्त्यावरून पावसाचे पाणी वाहून जायला कुठलीच व्यवस्था केली नसल्यानं अनेक वस्त्या पाण्याखाली गेल्या होत्या. परिस्थिती इतकी गंभीर झाली, की शहरात बोटीनं मदतकार्य करावं लागलं.

त्यामुळं देशभर सिमेंट रस्त्यांचं जाळं निर्माण करणाऱ्या नितीन गडकरींच्या गृहशहरातच आता सिमेंट रोडला कडाडून विरोध केला जातोय. शहरातील एक भाग बुडाल्यानंतरही महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी गंभीर होतील आणि चूक सुधारतील अशी अपेक्षा केली जात होती. मात्र, प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींना व अधिकाऱ्यांना नागरिकांशी काहीच घेणे-देणे नसल्याचं दिसून येतेय.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नंदनवन चौक ते गणेशनगर चौकदरम्यान सुमारे एक किलोमीटरच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जातेय. रस्त्याची उंची वाढुन पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरण्याचा धोका असल्यानं या रस्त्याला स्थानिकांनी आधी विरोध केला होता. त्यामुळे सुमारे पाच वर्षांपासून या रस्त्यावर डांबरच टाकलं जात नव्हतं. जागाेजागी खड्डे पडले होते. त्यानंतर प्रशासनाने सर्वांचा विरोध झुगारून सिमेंट रोडच्या कामाला सुरुवात केली. महिनाभरापूर्वी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन झालं. त्यावेळी पावसाचे पाणी घरात शिरणार नाही, याची दक्षता घेतली जाईल आणि पाणी वाहून जायला नाली कढली जाईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं.

प्रत्यक्षात ठेकेदाराने पावसाच्या पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करण्याऐवजी आधीच उपलब्ध असलेली ५० वर्षे जुनी आणि २० फूट खोली असलेली नाली मलबा टाकून बुजविणे सुरू केली. त्यामुळे या मार्गावरील जवळपास सर्वच घरांना पावसाच्या पाण्याचा फटका बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. नागरिकांच्या डोळ्यांसमोर पावसाळी नाली बुजवल्या जात असताना दाद कोणाकडे मागावी, असा प्रश्न या परिसरातील नागरिकांना पडलाय. महापालिका बरखास्त असल्यानं कुठलाही नगरसेवक याकडे लक्ष द्यायला तयार नाही. खासदार, आमदार व्यस्त आहेत. ते सहजासहजी भेटत नाही. त्यांच्याकडे तक्रार केल्यास दखल घेतली जाईलच, याची कुणाला शाश्वती नाही. दुसरीकडे महापालिकेचे अधिकारी कामं येऊन बघत नाही. त्यामुळे कंत्राटदाराची मनमानी सुरू आहे.

कंत्राटदार म्हणतो तुम्हीच खर्च करा

सांडपाण्याच्या नालीवर मलबा टाकून बुजवल्या जात असल्यानं अनेकांनी पावसाचे पाणी वाहून कसे जाणार असा प्रश्न केला. त्यावर ठेकेदारानं तुमचे तुम्ही बघा. गट्टू लावण्यापूर्वी स्वखर्चाने घरातील पाणी काढण्यासाठी पाइप टाका. एकदा रस्ता तयार झाल्यावर खोदण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे सांगून नागरिकांवरच खर्च करण्यासाठी दबाव टाकला जात असल्याचा आरोप होत आहे.

(Edited By : Atul Mehere)

Nagpur Road
Nitin Gadkari News: गडकरींच्या नागपुरातच आता लोकांचा सिमेंट रस्त्याला विरोध; आमदाराला धरले धारेवर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com