Nagpur BJP News : गडकरी आणि फडणवीसांसोबत उत्तम ताळमेळ, प्रवीण दटकेच राहणार भाजपचे अध्यक्ष ?

Pravin Datke : प्रवीण दटके यांनाच मुदतवाढ देण्याचे जवळपास ठरल्याचे समजते.
Nitin Gadkari, Pravin Datke and Devendra Fadanvis
Nitin Gadkari, Pravin Datke and Devendra FadanvisSarkarnama

Nagpur City BJP President Pravin Datke News : भाजपच्या शहराध्यक्षाबाबत गेल्या आठवड्यात शुक्रवारी (ता. ५) रविभवन येथे कोअर कमिटीची बैठक घेण्यात आली. याविषयी मत जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेश महामंत्री मुरलीधर मोहोड नागपूरमध्ये आले होते. त्यात प्रवीण दटके यांनाच मुदतवाढ देण्याचे जवळपास ठरल्याचे समजते. (Datke has good relations with both the leaders)

शहराध्यक्ष प्रवीण दटके यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. त्यामुळे नवा अध्यक्ष कोण होणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दोनच दिवसांपूर्वी प्रदेश भाजपची कार्यकारिणी जाहीर केली. त्यानंतर अनेक शहरांचे व जिल्ह्यांचे अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याचे बोलले जात होते.

आगामी महापालिका (Municipal Corporation) निवडणूक, (Election) त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुका असल्याने भाजपने (BJP) भाकरी फिरवण्याचे टाळल्याचे दिसून येते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) या दोन्ही नेत्यांसोबत दटके यांचे उत्तम संबंध आहेत. त्यांच्यासोबत योग्य ताळमेळसुध्दा दटके यांनी साधला आहे. युवा व ओबीसी नेता अशी ओळख दटके यांनी निर्माण केली असून भाजयुमोच्या कार्यकर्त्यांचा भक्कम पाठिंबा त्यांना आहे.

Nitin Gadkari, Pravin Datke and Devendra Fadanvis
MLC Pravin Datke म्हणाले, इतक्या झपाट्याने बदललेले दुसरे शहर देशात नाही...

कोअर कमिटीच्या बैठकीत कोणीच दटके (Pravin Datke) यांच्या नावाला विरोध केला नाही. उलट पाठिंबाच दिला असल्याचे समजते. त्यावरून दटके यांना मुदतवाढ मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. दटके यांना बदलण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरा कोणी इच्छुक नव्हता. याशिवाय आमदार या नात्याने दटके यांना अधिकाऱ्यांसोबत थेट संपर्क साधता येतो. त्यामुळे अध्यक्षाचा आढावा घेण्यासाठी घेण्यात आलेली ही बैठक औपचारिक होती, असे एका कार्यकर्त्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ‘सरकारनामा’ला सांगितले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com