Nagpur Assembly Elections : "गडकरी समर्थक असल्यामुळेच फडणवीस, बावनकुळेंनी मला निलंबित केलं"; भाजपच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप

BJP Poliitics in Nagpur : "नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात मतभेद आहेत. मात्र ते मला उघडपणे बोलता येणार नाहीत. हा विषय फार मोठा आहे. मात्र माझ्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून गडकरी यांच्या समर्थकांना नागपूर जिल्ह्यातून डावलण्यात येत असल्याचे दिसून येतं आहे."
Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule
Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Chandrasekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur Assembly Election 2024 : रामटेक विधानसभा मतदारसंघात शिंदे सेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांना उघड विरोध केल्याने भाजपचे माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी (Ex MLA Mallikarjuna Reddy) यांना पक्षातून निलंबित केलं आहे.

तर आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे समर्थक असल्यानेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास तडकाफडकी निलंबित केल्याचा खळबळजनक आरोप रेड्डी यांनी केला.

नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात मतभेद आहेत. मात्र ते मला उघडपणे बोलता येणार नाहीत. हा विषय फार मोठा आहे. मात्र माझ्यावर करण्यात आलेल्या कारवाईवरून गडकरी यांच्या समर्थकांना नागपूर जिल्ह्यातून डावलण्यात येत असल्याचे दिसून येतं आहे, असंही रेड्डी म्हणाले.

माजी आमदार गिरीश व्यास, माजी आमदार अनिल सोले हे आता सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. तेसुद्धा गडकरी यांचे (Nitin Gadkari) समर्थक आहेत. आज माझ्यावर कारवाई झाली. उद्या इतरांवरसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले. मला निलंबित केल्याने रामटेक मतदारसंघातील भाजपच्या पाचशे कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule
India Alliance : संघर्ष अस्तित्वाचा अन् महाराष्ट्रात दिसणार इंडिया आघाडीची एकजूट

रामटेक तालुत्याक तीन तहसील कार्यालय आहेत. तिथेही बैठका घेण्यात येतील आणखी शेकडो कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत आहेत. सर्व कार्यकार्त्यांसोबत चर्चा करून विधानसभेची निवडणूक लढायची की नाही याचा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

माझी चूक काय ते सांगा?

आशिष जयस्वाल यांनी मागील निवडणुकीत भाजपच्या विरोधात बंडखोरी केली होती. त्यामुळे माझा पराभव झाला. शिंदे सेनेचा रामटेक तालुक्यात एकच जिल्हा परिषद सदस्य आहे. भाजपचे तीन सदस्य आहेत. त्यामुळे जयस्वाल यांना आमचा विरोध आहे. आम्ही ते जाहीरपणे सांगितले.

Nitin Gadkari, Devendra Fadnavis, Chandrasekhar Bawankule
Savner Assembly Constituency : केदारांच्या मतदार संघावर रणजित देशमुखांच्या धाकट्या पुत्राचा दावा

भाजपचा उमेदवार द्यावा आणि राज्यात भाजपचा मुख्यमंत्री व्हावा अशी आम्ही मागणी केली होती. ती पक्षविरोधी कशी काय होऊ शकते याचे उत्तर प्रदेशाध्यक्षांनी द्यावे. आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनाही पत्र पाठवले आहे. मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांच्या दबावामुळे आपल्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे का? असा सवाल रेड्डी यांनी बावनकुळे यांना केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com