Nagpur Political News : नागपूर शहरात शनिवारी मुसळधार पाऊस पडला. या पावसाने महापालिकेचे सर्व नियोजन आणि दावे फोल असल्याचे उघड केले. घराघरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे पुन्हा शहराच्या विकास आणि प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
आज राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस. त्यांना पत्राद्वारे शुभेच्छा देताना एका नागपूरकराने महापालिकेच्या अधिकाऱ्यांची तक्रारच केली आहे. त्यांना कामे वेळेत करण्याची ताकीद द्या अशी विनंतीही केली.
फडणवीस यांना लिहलेले पत्र समाजमाध्यमांवर आता चांगलेच व्हायरल झाले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिला. यापूर्वी पाऊस यायचा, मात्र घराघरांमध्ये पाणी शिरत नव्हते. फक्त नागनदी आणि पिवळी नदीच्या शेजारच्या वस्त्या, झोपडपट्ट्या व खोलगट भागातच पाणी जमा व्हायचे. संपूर्ण शहराला धोका होत नव्हता.
मात्र अलीकडच्या काही वर्षांपासून एक-दोन पावसातच संपूर्ण शहर पाण्याखाली येऊ लगले आहे. याची कारणे सर्वांना माहिती आहे. त्याकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाहीत, असा नाराजीचा सूरही नागरपूरकाराने आळवला.
उंच होत चाललेले रस्ते, नदीनाल्यांवर झालेले बांधकाम, महापालिकेमार्फत केली जाणारी थातूरमातूर नद्या नाल्यांची सफाई आणि रस्ते बांधताना पावसाचे पाणी वाहून जाण्यांसाठी नाल्याच बांधल्या जात नसल्याने ही परिस्थिती उद्भवत आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पश्चिम नागपूर Nagpur मतदारसंघातील घराघरांमध्ये पाणी शिरले होते. लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. पन्नास वर्षांत प्रथमच पश्चिम नागपूरमध्ये पाणी शिरले. पश्चिम नागपूरमध्ये शहरातील सर्वाधिक विकसित भाग म्हणून ओळखला जातो. या भागात भाजपचा मतदार सर्वाधिक आहे.
नागरिकांच्या रोष बघून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीच्या बैठकीत घेतल्या होत्या. कोट्यवधीला नियोजनाचा आराखडा तयार केला. त्यास मंजुरी दिली. त्यानुसार काही पुलांचे नव्याने बांधकाम हाती घेण्यात आले. नद्या व नाल्यांतून पाणी वाहून जाताना येणारे अडथडे दूर करण्यात आले.
दरवर्षी महापालिका पावसाळ्यापूर्वी एक महिना आधी मॉन्सूनपूर्व कामे हाती घेत होती. यावेळी विशेष खबरदारी म्हणून हिवाळ्यापासूनच कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र शनिवारी पुन्हा एकदा पावसाने सर्व कामे तकलादू असल्याचे दखवून दिले आहे. यावेळी पश्चिमऐवजी दक्षिण आणि पूर्व नागपूरला पावसाचा मोठा फटका बसला आहे.
या पार्श्वभूमीवर एका कार्यकर्त्याने देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांना पत्र लिहून शहरातील समस्यांकडे त्यांचे लक्ष वेधले. यात त्याने आपण स्वतः बैठका घ्या आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वेळेत काम करणयाची ताकीद द्या, शहराच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी देण्यात आला आहे, असे असतानाही कामे अपूर्ण आहेत. कोणी बघणारा नाही, मनमानी कारभार सुरू आहे, कृपा करून आपण स्वतः पाहणी करावी अशी विनंती त्याने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.