Nagpur Congress News : लोकसभा निवडणूक तयारीच्या बैठकीचे अनेकांना निमंत्रण नाही; राऊत-चतुर्वेदी गट दूरच !

Congress : शहरातील अर्धीच काँग्रेसची मंडळी उपस्थित होती.
Vijay Wadettiwar, Vikas Thakre, Vilas Muttemwar and Abhijeet Wanjari.
Vijay Wadettiwar, Vikas Thakre, Vilas Muttemwar and Abhijeet Wanjari. Sarkarnama
Published on
Updated on

The invitation to the meeting was not given : विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक विजय वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या तयारीसाठी बोलावलेल्या बैठकीला शहरातील अर्धीच काँग्रेसची मंडळी उपस्थित होती. बैठकीचे निमंत्रणच दिले गेले नाही, अशी तक्रार बैठकीनंतर अनेकांनी केली. (Supporters of MLA Vikas Thackeray were present in large numbers)

बैठकीला कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मात्र चतुर्वेदी आणि राऊत यांच्या संपर्कातील पदाधिकारी व कार्यकर्ते गैरहजर होते. अनेकांना बैठकीचे निमंत्रणच शहर कार्यालयातून देण्यात आले नाही. काहींना वेळेवर फोन करून सांगण्यात आले, अशाही तक्रारी आहेत.

यापूर्वीसुद्धा अनेक पदाधिकाऱ्यांनी शहराच्या बैठकीचे निमंत्रणच दिले जात नसल्याच्या तक्रारी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केल्या होत्या. माजी मंत्री नितीन राऊत शहराबाहेर असल्याचे सांगण्यात आले. सतीश चतुर्वेदी आणि त्यांचे समर्थक बैठकीकडे फिरकले नाहीत तर प्रफुल्ल गुडधे हजेरी लावून निघून गेले.

शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलासराव मुत्तेमवार, आमदार ॲड. अभिजित वंजारी, वाणिज्य व उद्योग सेलचे अध्यक्ष अतुल कोटेचा, सोशल मीडिया अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, हाजी अनिस अहमद, गिरीश पांडव, बंटी शेळके, संदेश सिंगलकर, ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रशांत धवड, डॉ. गजराज हटेवार, रमन पैगवार, प्रा. दिनेश बानाबाकोडे, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नॅश नुसरत अली यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

Vijay Wadettiwar, Vikas Thakre, Vilas Muttemwar and Abhijeet Wanjari.
Vijay Wadettiwar on Ravi Rana : आता बजरंगबली रवी राणाची पाठ फोडतील आणि म्हणतील...

निरीक्षक विजय वडेट्‍टीवार यांनी रविभवन येथे नागपूर (Nagpur) आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची तयारी सोबतच पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मत त्यांनी जाणून घेतले. वडेट्टीवार यांनी ब्लॉक अध्यक्षांकडून बीएलए, बूथ कमिटी, ब्लॉक कमिटी आदींचा आढावा घेतला. प्रत्येक ब्लॉक अध्यक्षांनी प्रभागनिहाय कामाचा आढावा दिला.

फक्त तीन दिवस द्या...

आगामी निवडणुका (Elections) जिंकायच्या असतील तर प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहा महिने पक्षाला देण्याचे आवाहन केले. आठवड्यातील तीन दिवस प्रामाणिकपणे कार्यकर्ते घरोघरी फिरले आणि जनतेसोबत संवाद साधला तरी मोठा फरक पडू शकतो. याकरिता जिल्ह्यात ग्रामपातळीवर तर शहरात वॉर्डनिहाय समिती तयार करा आणि घरोघरी जा, असा सल्ला वडेट्‍टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिला.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com