Vijay Wadettiwar on Ravi Rana : आता बजरंगबली रवी राणाची पाठ फोडतील आणि म्हणतील...

Maharashtra Government : जनतेला लुटणे हे त्यांचे काम निश्‍चितच नाही.
Vijay Wadettiwar and Ravi Rana
Vijay Wadettiwar and Ravi RanaSarkarnama
Published on
Updated on

Bajrangbali will break Rana's back : कर्नाटकमध्ये भाजपने बजरंगबलीच्या नावावर मते मागितली. पण बजरंगबलीसुद्धा त्यांना वाचवू शकले नाही. तेथे येवढा मोठा पक्ष वाचला नाही, तर येथे तो रवी राणा काय वाचणार? आता बजरंगबलीच गदा मारून राणाची पाठ फोडतील आणि म्हणतील की, माझं नाव घेऊ नको, असे म्हणत हनुमान चालिसा पठण करणाऱ्या राणा दाम्पत्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला. (Vadettiwar fired at the rulers)

सरकार जबाबदारीने वागणार असेल तर विरोधी पक्ष नेता जबाबदारीने वागतील. त्यांची बेजबाबदार वागणूक जनतेसमोर आणणे आमचे काम आहे. जनतेला लुटणे हे त्यांचे काम निश्‍चितच नाही, असे म्हणत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. आज (ता. १२) सकाळी पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सरकार जर चुकीची कामे करीत असेल आणि ही बाब लक्षात आल्यावर त्याबद्दल बोलत राहणे हे माझे काम आहे आणि ते मी करत राहणार.

आपला देश संविधानाने चालणारे आहे. मात्र आसामचे मुख्यमंत्री सांगतात की, मला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही. आसामच्या मुख्यमंत्र्यांचे बोलणे म्हणजे देशद्रोह आहे, त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही.

पंतप्रधानांनी आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, तो घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू, असेही ते म्हणाले. नवाब मलिक आता अजित पवारांच्या गटासोबत जातील, असा संशय माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. यावर मी आज बोलणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

Vijay Wadettiwar and Ravi Rana
Vijay Wadettiwar On Amit Shah: '' खोटं बोलून देश चालवला जात आहे..''; वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले !

मलिकांच्या बाबतीत पुढे काय होते, ते पहावे लागेल, ते कुठे जातात? ते अजित पवारांकडे जातात का, हे आत्ताच सांगता येणार नाही. आजवर इडी, सीबीआयच्या विरोधात बोलणारे आता सत्तेसाठी मूग गिळून गप्प राहतात का, हेसुद्धा येणाऱ्या काळात कळणार आहे. त्यामुळे आजच काही अंदाज बांधणे योग्य होणार नाही, असे वडेट्टीवार म्हणाले.

पुण्याच्या चांदणी चौकात आज उड्डाण पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम सुरू आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, तिन्ही पक्षांचे तोंड तीन दिशेने आहेत. सगळ्यांची नजर मुख्य मुख्य पदावर आहे. ज्यांच्याकडे मुख्य पद आहे, त्यांना ते टिकवायची आहे. तर इतर दोघांना ती मिळवायची आहे. सरकारमधील तीन पक्षांमध्येच आपापसात मतभेद असतील तर राज्य सुरळीत चालेल का, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar and Ravi Rana
वडेट्टीवार बोलले ; BJP - shivsena च्या नेत्यांना झोंबलं | Wadettiwar | Mungantiwar | Shewale

महाराष्ट्राच्या (Maharashtra) ३६ जिल्ह्यांत प्रत्येकी एक राज्यपाल (Governor) नेमावा. म्हणजे कुठल्याही जिल्ह्यात वाद होणार नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात एक राज्यपाल नेमा अशी माझी सूचना असल्याचे वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com