Congress Politics : रणजित कांबळेंचे ‘निरीक्षण’ ठाकरे, केदारांचे भवितव्य ठरवणार; सपकाळ लागले कामाला...

Nagpur Congress leadership Vikas Thakre Ranjit Kamble News : आमदार विकास ठाकरे हे सुमारे अकरा वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत.
Vikas Thakre, Ranjit Kamble
Vikas Thakre, Ranjit KambleSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सर्व जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष बदलाच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. याकरिता निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यासाठी माजी राज्यमंत्री व वर्धा जिल्ह्यातील देवळी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रणजित कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अहवालावर नागपूरच्या अध्यक्षांचे भवितव्य ठरणार आहे.

आमदार विकास ठाकरे हे सुमारे अकरा वर्षांपासून नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. नागपूरमध्ये संघटनात्मक निवडणूक झाल्या नव्हत्या. त्यामुळे ठाकरे यांनाच मुदतवाढ देण्यात आली आहे. मध्यंतरी काँग्रेस नेते राहूल गांधी यांनी एक व्यक्ती एक पद असे पक्षाचे धोरण जाहीर केले होते. त्यावेळी विकास ठाकरे यांनी शहर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

Vikas Thakre, Ranjit Kamble
Anil Deshmukh : अनिल देशमुखांमध्ये मोठा बदल; यावेळी तोंडी आरोपांऐवजी थेट मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लोकसभेची निवडणूक असल्याने ठाकरेंनाच कायम ठेवले होते. यावरून नागपूरमध्ये मोठा राडा झाला होता. ठाकरे यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी अनेक तक्रारी केल्या होत्या. शहराध्यक्ष बदलण्याची मागणी केली होती. याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेसच्या बैठकीत नरेंद्र जिचकार यांनी हातात माईक घेतला होता. यावरून ठाकरे आणि जिचकार समर्थकांमध्ये भर बैठकीत जुंपली होती.

जिचकारांचे कपडे फाडण्यात आले होते. त्यानंतर जिचकार यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून येऊन त्यांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे तर त्यापूर्वी माजी आमदार सुधाकर देशमुख यांचा त्यांनी पराभव केला आहे.

Vikas Thakre, Ranjit Kamble
Aurangzeb tomb : ...हे भारताच्या उदारतेचे आणि सर्वसमावेशकतेचे प्रतिक! औरंगजेबाच्या कबरीबाबत भय्याजी जोशींचं मोठं विधान

लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या भाजपच्या हेवीवेट नेत्याला विजयासाठी चांगलेच झुंजवले होते. ते विजय प्राप्त करू शकले नसले तरी गडकरी यांचे मताधिक्यात त्यांनी मोठी कपात केली. गडकरी यांनी पाच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून येण्याची घोषणा निवडणुकीत केली होती.

नागपूर ग्रामीणचे माजी अध्यक्ष राजेंद्र मुळक यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सत्तापक्षनेते बाबा आष्टनकर यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यानंतरही माजी मंत्री जिल्ह्याचे नेते सुनील केदारांनी काँग्रेसच्या बैठकीला मुळकांना बोलावले होते.

निलंबित असतानाही मुळत काँग्रेस कार्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे या बैठकीला प्रभारी अध्यक्ष बाबा आष्टनकर यांना बोलावण्यात आले नव्हते हे विशेष. आता निरीक्षक रणजित कांबळे शहर व जिल्हाध्यक्षपदासाठी कोणाची शिफारस करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com