
BJP Mumbai political infighting : मुंबई भाजपमधील गटबाजीवर नागपूरमधील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मिश्किल टोलेबाजी केली आहे.
"महाराष्ट्र असो की देश असो मुंबई भाजपमध्ये दोन गट आहेत. ते बंद खोलीत एकमेकांना ठोसाठोसी करतात. आमच्याकडे जास्त लोकशाही आहे, आम्ही उघडपणे करतो", अशी फटकेबाजी काँग्रेस विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
शेतकरी कर्जमाफीवर निर्णय न घेणाऱ्या भाजप महायुती सरकारवर काँग्रेस (Congress) आमदार विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली. वडेट्टीवार म्हणाले, "एकीकडे राज्यात लाखोचे कोटींचे प्रकल्प होत आहेत, मुंबईतील जमीन एका उद्योजकाला देण्यात येतात मग शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारला दिसत नाही का? शेतकऱ्यांना मदत करताना सरकारच्या हाताला लकवा मारतो का?"
शेतकरी (Farmers) आणि दिव्यांगांच्या विविध प्रश्नासाठी प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा देताना, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी केली. शेतकरी कर्जमाफी याबाबत समिती नेमणार असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. समिती नेमण्यापेक्षा सरकारने कर्जमाफी करावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला होता. आता मात्र चुकीची धोरणे आणि खोटी आश्वासन यामुळे शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. सरकार शेतकरी आणि शेतमजूर यांना वाऱ्यावर सोडत आहे. सरकारने निवडणुकीत दिलेली आश्वासन पूर्ण करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
शरद पवार जे बोलतात त्याचे दोन -तीन अर्थ निघतात. त्यांना नेमके काय सांगायचे व सुचवायचे आहे, हे जोपर्यंत स्पष्ट होत नाही तोपर्यंत काहीच बोलता येत नाही. महाराष्ट्र असो की देश असो मुंबई भाजपमध्ये दोन गट आहेत. ते बंद खोलीत एकमेकांना ठोसाठोसी करतात. आमच्याकडे जास्त लोकशाही आहे, आम्ही उघडपणे करतो, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.